महाराष्ट्र

'प्रभू रामचंद्रा'च्या मुद्यावर शिवसेना-भाजपची युती होईल : अजित पवार

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शिवसेना-भारतीय जनता पक्ष आज कितीही एकमेकांच्या विरोधात भांडत असले, तरी येत्या लोकसभा निवडणुकीत "प्रभू रामचंद्र' यांच्या मंदिराच्या मुद्यावर त्यांचे एकमत होऊन "युती' होईल, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

"निर्धार परिवर्तन' यात्रेनिमित्ताने ते जळगावात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की आज जरी दोन्ही पक्ष भांडत असले, तरी येत्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती होईल. राम मंदिराच्या मुद्यावर दोन्ही पक्ष एकत्र येतील आणि युती झाल्याचे जाहीर करतील. राज्यात राष्ट्रवादी-कॉंग्रेस व कॉंग्रेसची आघाडी झालेली आहे, मतांचे विभाजन टाळण्यासाठी इतर समविचारी पक्षांनाही आम्ही सोबत घेत आहोत. 

बापटांचा राजीनामा घेणारच नाहीत

रेशन दुकानादारांसंबंधित प्रकरणात राज्याचे मंत्री गिरीश बापट यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यांचा तुम्ही राजीनामा मागणार काय, या विषयावर बोलताना पवार म्हणाले, की बापटांचा राजीनामा ते घेणारच नाहीत, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे मागणी करूनही फायदा होणार नाही. अगदी राज्यातील 22 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावरही मुख्यमंत्र्यांवर कारवाई केलेली नाही. उलट त्यांना क्‍लीन चिट मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

पुणे लोकसभेवर दावा कायम 

आघाडीत जागावाटप अंतिम झालेले नाही, असे सांगून ते म्हणाले, की पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा कायम आहे. याशिवाय रत्नागिरी, औरंगाबाद, जालना या मतदारसंघांबाबतही बोलणी सुरू असून, लवकरच त्यावर निर्णय होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT