shiv sena leader bhaskar jadhav esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhaskar Jadhav: दुष्परिणामांची चिंता करीत नाही; चिपळूणमध्ये जाधवांचा एल्गार

संतोष कानडे

रत्नागिरीः ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज चिपळूणमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. एकदा भूमिका घेतल्यानंतर मी कधीही दुष्परिणामांची चिंता करीत नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं.

भास्कर जाधव यांच्या घरावर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या घराबाहेर काही संशयास्पद वस्तूदेखील आढळल्या आहेत. याशिवाय भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विखारी शब्दांमध्ये जाधवांवर टीकास्र सोडलं. आज निलेश राणेंनीही त्यांना टार्गेट केल्याचं दिसून आलं.

आज शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान भास्कर जाधव चिपळूण स्थानकावर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी बोलतांना जाधव म्हणाले की, मागील काही दिवसांपासून आमच्या पक्षप्रमुखांवर खालच्या स्तरावर टीका केली जात आहे. आमचे ४० सहकारी सोडून गेले. भाजपने शिवसेना पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे शिवसैनिक आतल्या आत तळपत आहे. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन करीत आहेत. परंतु आता शिवसैनिक डरकाळी फोडण्याच्या तयारीत असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

एकदा भूमिका घेतल्यानंतर आपण परिणामांची चिंता करीत नाही, असं भास्कर जाधवांनी यावेळी ठणकावून सांगितलं. भाजप नेते आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून वाक् युद्ध सुरु आहे. आरोप-प्रत्यारोप करतांना उभय पक्षांकडून एकमेकांवर खालच्या स्तरावर बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर माकडांची एंट्री! घरात गोंधळाचे वातावरण; बचावासाठी पोलिसांसह अग्निशमन दलाला पाचारण

ENG vs IND: भारत-इंग्लंडचे खेळाडू दंडाला काळी पट्टी बांधून लॉर्ड्सवर का उतरले? कारण वाचून जड होईल अंतःकरण

Jalna Campaign: भेसळखोरांविरोधातील धडक मोहिमेला जालन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; तुकाराम मुंढेंच्या कौतुकाचे बॅनर शहरभर झळकले

Ghodagaon Police Action: घोडेगाव पोलिसांचा धडाकेबाज तपास: एका दिवसात ४ गुन्ह्यांत ८ आरोपी दोषी, २०२५-२६ मध्ये ४४ प्रकरणांत शिक्षा

Solapur Crime: बोराळे दारूमुक्तीसाठी महिलांचा रस्त्यावर मोर्चा; पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे यांचा अवैध दारूविक्रीविरोधात तीव्र इशारा

SCROLL FOR NEXT