CM Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

"उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून काँग्रेसची लोकं जीवंत झाली"

शिवसेना आमदाराच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सुधीर काकडे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार की नाही, यावर चर्चा सुरु आहेत. त्यातच तिन्ही पक्षांचे वेगवेळे नेते वारंवार एकमेकांवर आरोप करताना दिसता आहेत. या वादात आता शिवसेना आमदार आशीष जयस्वाल यांनी आणखीच भर घातल्याचे पाहायला मिळते आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये समावेश करुन घेतला म्हणून काँग्रेसचे लोक जिवंत झाले, असे म्हणत आशीष जयस्वाल यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

जिल्हा परिषदच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसता आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करण्याच्या सुचना कार्यकर्त्यांना देताना दिसता आहेत. नागपूरमधील शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांनी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बोलत असताना, 'काँग्रेसचे लोकं मेले होते, त्यांना कोणी विचारत नव्हतं, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना सरकारमध्ये घेतलं आणि ते जिवंत झाले' असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT