Uddhav Thackeray: 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: अखेर ठाकरेंच्या समर्थक आमदार नरमले! विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला दिलं उत्तर

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या सर्व आमदारांना नोटिसा पाठवल्या होत्या.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अपात्रतेच्या मुद्द्यावरुन शिवसेनेच्या ४० आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटिसा पाठवल्या होत्या. या नोटिशींना उत्तर देण्याची मुदत काल संपली होती, पण उद्धव ठाकरेंच्या समर्थक आमदारांनी उत्तर न देता थेट केराची टोपली दाखवली होती.

पण आता त्यांनी या नोटिशींना उत्तर दिलं आहे. हे उत्तर का दिलं याबबत खुलासाही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. (Shiv Sena MLA disqualification Uddhav Thackeray group MLA finally gives answer to notice of Speaker)

ठाकरे गटानं सांगितलं की, कायदेशीर सल्ला घेत विधानसभा अध्यक्षांच्या नोटीशीला एकत्रित उत्तर देण्यात आलं आहे. सुनावणी आणि कायदेशीर पेच टाळण्यासाठी वकिलांचा सल्ला घेत हे उत्तर देण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

उत्तर देण्याची गरज नसल्याची मांडली होती भूमिका

दरम्यान, मुदत संपल्यानंतरही ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला उत्तर दिलं नव्हतं. आम्हाला या नोटिशीला उत्तर देण्याची गरज नाही, अशी भूमिका ठाकरे गटानं मांडली होती. पण पुढील कायदेशीर पेच टाळण्यासाठी त्यांनी या नोटिशीला उत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Crime News : जुने नाशिक मधील मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा; देहविक्री व्यवसाय उघड, ५ महिलांची सुटका

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

SCROLL FOR NEXT