Mantralay maharashtra sakal media
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra News : मंत्रालयात गाडीला प्रवेश नाकारला, शिंदे गटाच्या आमदाराचा गेटवरच राडा

मंत्रालयात प्रवेश नाकारल्याने शिंदे गटाच्या आमदाराने मंत्रालयाच्या गेटवरच राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे

रोहित कणसे

मंत्रालयात प्रवेश नाकारल्याने शिंदे गटाचे आमदाराने मंत्रालयाच्या गेटवरच राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नवीन नियमानुसार आमदाराच्या गाड्यांना मंत्रालयात प्रवेश नसल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी गाडी रोखली. मात्र यामुळे संतापलेले शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांची गाडी काही वेळासाठी गेटवरच उभी केल्याचे पाहायला मिळालं.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल कॅबिनेटच्या बैठकीनंतर मंत्रालयाच्या परिसरात घडली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे आपल्या कामानिमीत्त मंत्र्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात येत होते. यावेळी हा प्रकार घडला. एबीपी माझाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

यापूर्वी मंत्र्यांच्या गाड्यासोबतच आमदारांच्या गाड्यांना देखील मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. मात्र शिरसाट यांना गेटवर आता नविन नियमानुसार आमदारांच्या गाड्यांना मंत्रालय परिसरात प्रवेश दिला जाणार नाही असं सांगण्यात आलं. यानंतर संजय शिरसाट यांनी याचा विरोध म्हणून आपली गाडी काही वेळ मंत्रालय गेटवरच उभी केली, ज्यामुळे कोणतीही गाडी मंत्रालयात आत किंवा बाहेर येऊ शकली नाही. अखेर या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढे येत मध्यस्थी करावी लागली.

अखेर शिरसाट यांच्या गाडीला प्रवेश दिला गेला. मात्र आमदार संजय शिरसाट यांनी या घटनेबद्दल विरोध संबंधीत अधिकारी आणि मंत्र्यांकडे नोंदवल्याची माहिती मिळत आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारस ही घटना मंत्रालय परिसरात घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT