MLA Disqualification 
महाराष्ट्र बातम्या

MLA Disqualification: राहुल शेवाळे जितकं खोटं बोलतील, तितकं चांगलं; सुनिल प्रभू असं का म्हणाले?

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी संपली आहे. सोमवारी पुन्हा याप्रकरणी सुनावणी सुरु होईल.

कार्तिक पुजारी

मुंबई- शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी संपली आहे. सोमवारी पुन्हा याप्रकरणी सुनावणी सुरु होईल. सुनावणीनंतर शिंदे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभू म्हणाले की, राहुल शेवाळे जेवढं खोटं बोलतील, तितकं चांगलं आहे कारण ते जितकं खोटं बोलतील ते तितकं अडचणीत येतील.

राहुल शेवाळे म्हणाले की पक्षाच्या घटनेमध्ये दुरुस्ती करुन मुख्य नेता पद निर्माण केले आहे. शेवाळेंचे वकील ज्या पीटिशनचा उल्लेख केला ती १९९९ ची घटना आहे. पण, १९९९ साली मुख्य नेता पद होतं का? मग ते मुख्य नेते पद कसं निवडू शकतात. त्यांना अधिकार नाही. जे काही आहे ते खोटं आहे. खोटं बोल पण रेटून बोलं असं त्याचं वर्तन आहे. पण, शेवटी सत्याचा विजय होईल असा माझा विश्वास आहे, असं प्रभू म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचे आणि मुंबईचे असणारे नाते अतूट आहे. ते कधीही तुटणार नाही. मुंबईकरांना पूर्ण विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे. त्यांनी करुन दाखवलेली कामे लोकांसमोर आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा एकदा आमचीच सत्ता येईल, असंही प्रभू म्हणाले.

सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराचे शिखर गाठले आहे. येत्या काळात हे बाहेर येईल, असंही ते म्हणाले. नवाब मलिकांबाबत प्रभू म्हणाले की, मेडिकल लिव्हवर नवाब मलिक हे बाहेर आहेत. विधानसभेत येऊन त्यांना मस्टरवर स्वाक्षरी करावी लागते. त्यामुळे ते आले असतील. त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट दिले आहे. मेडिकल लिव्हवरच ते बाहेर आहेत.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी सुरु आहे. यावेळी दोन्ही गटाचे नेते तेच-तेच मुद्दे उपस्थित करत असल्याने अध्यक्ष चिडल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारपर्यंत सर्व युक्तीवाद पूर्ण करण्याच्या सूचना अध्यक्षांनी ठाकरे आणि शिंदे गटाला दिल्या असल्याची माहिती आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT