Rahul Narwekar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narwekar: आमदार अपात्रतेचा निर्णय कधी? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले...

Rahul Narwekar: 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

राहुल शेळके

Rahul Narwekar: 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण अनेक दिवसांपासून सुरु आहे. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ''आमदार अपात्रते संदर्भातील कार्यवाही वेगाने सुरु आहे. आमदार अपात्रते संदर्भात लवकरच सुनावणी सुरु होईल. सगळ्या नियमांचंं पालन करुन आणि संविधानिक तरतुदींचं पालन करुन निर्णय घेतला जाईल. यामध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही.''

राज्यभरात प्रचंड उत्सुकता असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत परखड शब्दांमध्ये राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे आढले होते.

तसेच अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील. त्यासाठी त्यांना निश्चित कालावधी देण्यात आला आहे.

त्यावर नार्वेकर यांनी शिवसेनेच्या सर्व म्हणजे एकनाथ शिंदे गटाच्या तसेच ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली होती.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस जारी केली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी त्यांनी दिला होता.

अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांना सबळ पुरावे सादर करावे लागणार आहे. याशिवाय बंडखोर आमदारांच्या पुराव्यांनी समाधान न झाल्यास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकतात.

शिवसेनेच्या मूळ घटनेचा अभ्यास करून यावर निर्णय घेतला जाईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT