sanjay-raut 
महाराष्ट्र बातम्या

संजय राऊत यांचा अखेर ‘यू टर्न’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीविषयी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात राजकीय धुरळा उडाला. त्यानंतर राऊत यांनी माघार घेतली आहे.

इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांची भेट व्हायची, असे वक्‍तव्य संजय राऊत यांनी केले होते. कुख्यात गुंड करीम लाला याला भेटण्यासाठी इतर नेते जसे जात होते, तसे इंदिरा गांधीही भेटत होत्या, असे संजय राऊत मुलाखतीत म्हणाले होते. त्यावरही संजय राऊत यांनी दुसऱ्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत पुन्हा स्पष्टीकरण दिले. देशातील अनेक नेते करीम लाला याला भेटत होते. करीम लाला पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. या संघटनेला अनेक नेते भेट देत होते. इंदिरा गांधींबद्दल माझ्याएवढा आदर कुणी दाखवला नाही. इंदिरा गांधींवर टीका झाली त्या वेळी काँग्रेसवालेही शांत होते, असे संजय राऊत म्हणाले होते. मात्र, दुपारनंतर संजय राऊत यांनी वक्तव्य मागे घेतले. 

फडणवीस यांनी राईचा पर्वत करू नये ः बाळासाहेब थोरात
देवेंद्र फडणवीस यांनी राईचा पर्वत करू नये, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. थोरात म्हणाले की, इंदिरा गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे. पण, भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत. महान राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी संजय राऊत यांनी चुकीची विधाने केली आहेत. एक कर्तबगार नेत्या म्हणून संपूर्ण जगामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करणे अयोग्य आहे. कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी चालेल; पण त्यांच्याबद्दल अपशब्द आम्ही खपवून घेणार नाही.
- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

लाथ मारायची; मग सॉरी म्हणायचे, ही इंग्रजांनी आणलेली पद्धत आहे. आता संजय राऊत सॉरी म्हणत असतील आणि ते काँग्रेसला मान्य असेल, तर आम्हाला काही अडचण नाही.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी गप्प का आहेत? काँग्रेसने राऊत यांच्या आरोपांना उत्तर न दिल्यास त्यांच्या वक्तव्यात तथ्य आहे, असे मानले जाईल. काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करीत होते का?
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Marathi Live Updates : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, २० बंधारे पाण्याखाली; पंचगंगा धोक्याच्या दिशेने, प्रशासन सतर्क

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

SCROLL FOR NEXT