महाराष्ट्र बातम्या

दिल्लीवरुन थेट 'मातोश्री'वर, संजय राऊत- उद्धव ठाकरे यांच्यात खलबतं

नामदेव कुंभार

मुंबई : भाजपविरोधी राजकीय पक्षांच्या दिल्लीत झालेल्या घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या राजकीय भेटींबाबत ठाकरे आणि राऊत यांच्यात चर्चाही झाली आहे. लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशपातळीवर भाजपविरोधी पक्षांची जमवाजमव सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या ब्रेकफास्ट बैठकीत संजय राऊत सहभागी झाले होते. त्यानंतर आज मुंबईत येताच त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीत पक्ष संघटनेबाबत चर्चा झाल्याचे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दिल्लीत होत असलेल्या राजकीय भेटीगाठींबाबत चर्चा झाली. २०२४ मध्ये युतीच्या प्रश्‍नावर जी काही चर्चा झाली त्याची माहिती मी माझ्या पक्षप्रमुखांना सांगेन, असे राऊत यांनी तेव्हा राहुल गांधी यांना सांगितले होते.

राहुल गांधी यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्याबाबत त्यांनी काही गोष्टी जाणून घेतल्या. शिवसेनेने जे केले ते योग्य केले. शिवसेनेची मालकी कोणाकडे नाही.

संजय राऊत, खासदार, शिवसेना

आरक्षणावर घटनात्मक चर्चा

मराठा आरक्षणाबाबत मत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सगळ्यांना माहिती देतील. संसदेत मराठा आरक्षणाबाबत घटनात्मक चर्चा मागणार आहोत, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

'अरे काय हे' एका खलनायिकेसाठी १३ नायिका एकत्र, ठरलं तर मग मालिकेत महासंगम, नेटकरी म्हणाले, ' झुंड में सुवर आते हे शेर अकेला...'

Latur News: आयपीएल सट्टाप्रकरणी चौघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Beed News: थांबणार नाही रेल्वेचे इंजिन; सर्व पेच सुटले; जिल्हाधिकाऱ्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन; शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्यांवर तोडगा

Organ Donation: अंतिम निरोपातून होतेय आशेची नवी पहाट; कऱ्हाडच्या सहा जणांचा मृत्यूनंतरही देहदानातून जिवंत राहण्याचा संकल्प, माणुसकीचा नवा आदर्श!

SCROLL FOR NEXT