sanjay raut sanjay raut
महाराष्ट्र बातम्या

तो शब्द देशातला नाही तर...; संजय राऊतांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

टीव्हीवर मुलाखतीवेळी वापरलेला शब्द आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत भाजपच्या महिला मोर्चाने राऊतांविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेना (Shivsena) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी रविवारी मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी दोन खासगी टीव्ही चॅनेलवर दिलेल्या मुलाखतींमध्ये भाजप कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. भाजप (BJP) महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस दीप्ती रावत भारद्वाज (dipti rawat bhardwaj) यांनी मंडवली पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दिली होती, या मुलाखतीचा व्हिडिओही पोलिसांना सादर करण्यात आला होता. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, दिल्ली मधल्या एका पोलीस ठाण्यांमध्ये माझ्या विरोधात तक्रार नाहीतर गुन्हा दाखल झाला आहे. कुणाला मूर्ख म्हणणं, अशिक्षित अडाणी म्हणणं हे वारंवार आपल्या राजकारणात आपण शब्द वापरतो. मी तो शब्द वापरला. तो शब्द या देशातला नाही तर जगातल्या कुठल्याही डिक्शनरी मध्ये त्याचा अर्थ पाहिला तर मूर्ख बुद्धू असा दिलेला आहे. जर या शब्दाबाबत गुन्हे दाखल व्हायला लागले तर या देशात कायद्याचे राज्य राहिलेलं नाही.

माझ्याकडे सीबीआय, इन्कम टॅक्स यांना सरकार पाठवू शकलं नाही म्हणून त्यांनी नव्याने हा एक गुन्हा दाखल केला आहे. पार्लमेंट सुरू असताना एखाद्या खासदारावर असे गुन्हे दाखल करण्याचे धाडस त्यांनी दाखवलं आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत अशा शब्दात राऊतांनी उत्तर दिलं.

गोव्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताने संजय राऊत म्हणाले की, या संदर्भात अजून तरी प्राथमिक अवस्थेत चर्चा सुरू आहेत. प्रत्येक पक्षाला वेळ द्यावा लागेल ज्या राज्यात अशा प्रकारच्या आघाड्या करायच्या आहेत त्या राज्यात देखील स्थानिक काय अशी चर्चा करावी लागेल. जर नाही झालं तर आम्ही स्वतंत्रपणे देखील लढायला तयार आहोत. गोव्यामध्ये आम्ही 22 जागा लढायला तयार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिनी खासदार अमोल कोल्हे यांनी एक विधान केलं होतं. मोदी जर पंतप्रधान होऊ शकतात तर शरद पवार का नाही असं ते म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, 2014 ला मोदी प्रधानमंत्री होऊ शकतील असं कोणाला वाटलं नव्हतं. राजकारण फार चंचल आहे. देशातील लोकशाही देखील चंचल आहे परंतु देशातील जनता शहाणी आहे. सर्वांचे मतभेद दूर करून त्यांना एकत्र आणण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं असल्याचं राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT