shiv sena sanjay raut ed case mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

Patra Chawl Case : संजय राऊतांना मोठा झटका, 22 ऑगस्टपर्यंत तुरुंगात रवानगी

न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sanjay Raut Latest News : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेने नेते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजापासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. या सर्वामध्ये न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना काहिसा दिलासा मिळाला आहे.पत्राचाळ जमीन प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.

पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीनं ९ तास संजय राऊतांची चौकशी केल्यानंतर 31 जुलै रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दोनदा ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आता राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात असणार आहे. या सर्वांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता जामीन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यासही परवानगी दिली आहे.

वर्षा राऊत यांचीही चौकशी

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांना मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप ईडीकडून लावला जात असून विविध अकाउंटवरून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर एक कोटीपेक्षा जास्त पैसे आल्याचा आरोप केला जात आहे. पत्राचाळ प्रकरणातील या अवैध पैशांमधून त्यांनी अलिबागमध्ये जमीन घेतल्याचा आरोप केला जात असून, ईडीने त्यांना समन्स बजावल्यानंतर त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.

काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT