Eknath shinde uddhav Thackeray supreme court hearing cji shiv sena sakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv sena crisis: ''एक काम करा तुम्हीच इथं येऊन बसा अन् काय करायचं ते करा'' सुनावणीवेळी CJI चिडले; शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमकं काय घडलं?

Hearing in Supreme Court: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नव्हतं. या प्रकरणात ठाकरे गटाच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे तर अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या 41 आमदारांना अपात्र करावं, यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.

संतोष कानडे

Shiv sena NCP disqualification case: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपत्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टातमध्ये सुरुवातीला शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आपत्रता प्रकरणी सुनावणी झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांच्यासोबत गेलेल्या 39 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नव्हतं. या प्रकरणात ठाकरे गटाच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे तर अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या 41 आमदारांना अपात्र करावं, यासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे.

अजित पवार गटाच्या आमदारांना यापूर्वीच कोर्टाने नोटीस पाठवून उत्तर मागवलं होतं. मंगळवारच्या सुनावणीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रताप्रकरणी अजित पवार गटाने वेळ मागितला आहे. अजित पवार गटाने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टात नेमकं काय झालं, याची माहिती अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे. मंगळवारी कोर्टाने म्हटलं की शिवसेनेची कागदपत्रं पूर्ण आहेत पुढील सुनावणीवेळी आम्ही थेट युक्तिवाद ऐकू घेऊ. त्यासाठीची तारीख आम्ही लवकरच देऊ.

''कोर्टाने संकेत दिले आहेत की आमदार अपात्रता प्रकरण हे आम्ही सुप्रीम कोर्टातच ऐकू.. विधानसभा निवडणुकीच्या आधी याप्रकरणी निकाल अपेक्षित आहे. शक्यता आहे की सप्टेंबर महिना किंवा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात या प्रकरणाचा निकाल लागू शकतो.'' असं अॅड. शिंदे यांनी सांगितलं.

कोर्टरुममध्ये ठाकरे गटाच्या वतीने एका वकिलाने कोर्टाला सांगितल की, या प्रकरणाला विलंब लागतो आहे. तुम्ही लवकर तारीख द्या. त्यावर कोर्ट म्हणाले तुम्ही आमच्या इथे येऊन बसा आणि तुम्हीच ठरवा. आम्ही एक-दोन आठवड्यात तारीख देऊ.. सीजेआय चंद्रचूड यांनी प्रश्न उपस्थित करणाऱ्या वकिलाला अशा प्रकारे सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, पण भारताला २०० धावांच्या आत रोखण्यात झिम्बाब्वेला यश; श्रेयस अय्यरची टीम व्हाईटवॉश देणार?

Viral Video : अंतराळातून दिसला भारताचा थक्क करणारा नजारा; वादळी ढग अन् विजांचा कडकडाट, ISS चा व्हिडिओ व्हायरल

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

प्रदूषणामुळे वाढतोय 'डिमेंशिया'चा धोका; जीवनशैलीत करा 'हे' बदल! WHO ने सांगितले उपाय...

SCROLL FOR NEXT