महाराष्ट्र बातम्या

ShivSena: शिंदे गटाचा आणखी एक विजय, विधिमंडळानंतर आता हे कार्यालय देखील ठाकरेंनी गमावलं

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाकडे आले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदे गटाकडे आलं आहे. उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी माहिती दिली आहे. (Shiv Sena office in Parliament to CM Eknath Shinde )

विधानसभेपाठोपाठ आता संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदेंच्या ताब्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाच्या उपसचिवांकडून अधिकृत पत्र जारी करत शिंदे शिवसेनेला कार्यालय देण्यात आलं आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने आता आपला मोर्चा शिवसेना कार्यालयाकडे वळवला आहे. यानुसार आज विधीमंडळातील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवला. त्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह इतर आमदार शिवसेना कार्यालयात प्रवेश केला.

पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट टप्प्याटप्प्याने राज्यतील शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेऊ शकते. याचा प्रयत्नही दापोली व नेरुळमध्ये करण्यात आला. यावेळी शिंदे गट व ठाकरे गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे येत्या काही दिवसांत दोन्ही गटात संघर्ष अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT