Anandraj Ambedkar and Eknath Shinde shake hands as Republican Sena and Shiv Sena seal alliance ahead of local body elections in Maharashtra.  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना टाकला मोठा डाव! , आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत दिसणार 'हा' पक्ष!

Shiv Sena Alliance: आगामी निवडणुकीत दिसणार परिणाम; संयुक्त पत्रकारपरिषदेत आज घोषणाही केली जाणार

Mayur Ratnaparkhe

Eknath Shinde Shiv Sena News: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडामोड घडेल काहीच सांगता येत नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या, या दरम्यान कशाप्रकारे नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या हेही सर्वांनी पाहिलं आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आणि सर्वसामान्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे.

राज्यातील प्रत्ये राजकीय पक्षाने त्यासाठी कंबरही कसली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधाती महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा राजकीय डाव टाकला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती होणार आहे. हे दोन्ही पक्ष आगामी महापालिका निवडणुका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढणार आहेत.

याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर हे दोन्ही प्रमुख नेते संयुक्त पत्रकारपरिषद घेत बुधवारी दुपारी घोषणाही करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच आता पुन्हा एकदा शिव शक्ती अन् भीम शक्तीचा प्रयोग पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. याअंतर्गत मराठा आणि दलित मतांची मोट बांधण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT