Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "शिवसेना संपवण्यासाठी शरद पवारांनी दिली सुपारी"

शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा शरद पवार यांच्यावर आरोप

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गटाचे संजय राऊत यांना सुपारी दिली असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हंटलं आहे.

तर संजय राऊत यांनी बनवलेला हा सगळा डाव आहे आणि एक स्क्रिप्ट आहे. मातोश्रीमध्ये वजन वाढावं म्हणून राऊत यांना रोज मुख्यमंत्री यांच्या संदर्भात सकाळ, दुपारी बोलायचे असते. तर शरद पवारांनी संजय राऊत यांना शिवसेना संपवण्याची सुपारी दिली होती असंही म्हस्के यांनी म्हंटलं आहे.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेना संपवण्यासाठी शरद पवारांनी संजय राऊत यांना सुपारी दिली होती. अजित दादा यांचे पुतळे जाळण्यासाठी जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांना फोन केले होते मग हे कशाला केले. कायम अजित दादा यांच्यावर ठपका ठेवायचा होता का? हे पण त्यांनी समजून घेतले पाहिजे असंही नरेश म्हस्के यांनी म्हंटलं आहे.

संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांनी मारायची सुपारी दिली आहे, अशा प्रकारचा आरोप केला होता. माझ्या माहितीनुसार, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाणे पोलिस आयुक्त, गृह मंत्रालय यांना पत्र दिलं आहे.पोलिस त्यांच्याकडे गेले होते जबाब घ्यायला पण त्यांनी उत्तर दिलं नाही. आज सकाळी पण अधिकारी जबाब घ्यायला गेले होते आणि त्यात मला असं कळत आहे की संजय राऊत यांनी घुमजाव केला असंही नरेश म्हस्के यांनी म्हंटलं आहे.

तर संजय राऊत म्हणत आहेत की एका कबड्डीच्या सामन्यादरम्यान माझ्या अंगावर शाई फेकणार असं कळलं होतं काल म्हणाले हत्या करणार संजय राऊत खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्याचे बिनबुडाचे आरोप करत आहेत. एकही पुरावा पोलिसांना त्यांनी दिलेला नाही. राजा ठाकूर यांनी धमकी दिली आहे का? असे विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी काही सांगितलेलं नाही असंही नरेश म्हस्के पुढे म्हणालेत.

धनुष्य बाण गेल्यामुळे संतापलेले शिवसैनिक त्यांना चोपून काढतील अशी त्यांना भीती आहे. उद्धव ठाकरे यांची परिस्थिती संजय राऊत यांच्यामुळे झाली असल्याचा आरोपही नरेश म्हस्के यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT