shiv sena symbol Be prepared for a new sign Uddhav Thackeray’s big statement esakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेने धनुष्यबाणाची आशा सोडली? उद्धव ठाकरेंच्या विधानामुळे चर्चा

धनश्री ओतारी

शिंदे गटाने धनुष्यबाण या चिन्हावार दावा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हाची तयारी ठेवा असे आवाहन केले असल्याची नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेला मिळणार चिन्ह कमी कालावधीत घरा घरात पोहचवा असे ठाकरे यांनी म्हटले असल्याचेही सांगण्यात येत आहे. (shiv sena symbol Be prepared for a new sign Uddhav Thackeray’s big statement)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने त्यांच्या गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. या कारवाईला शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

मात्र, अपात्र आमदारांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यापूर्वीच राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारमध्ये सत्तांतर झाले आहे. . एकनाथ शिंदे गट आणि भाजपने नवीन विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करून शिवसेनेला नवे बळ दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात केली आहे.

शिवसेनेतून फुटलेल्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी यासाठी येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे गट सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यात त्यांना यश मिळू नये यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटच पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाचा खरा दावेदार आहे. असे शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास गाफिल राहू नका, पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा. जे नवे निवडणूक चिन्ह येईल ते स्वीकारून लवकरात लवकर त्याची पूर्वतयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. “माझी प्रकृती ठीक असल्याने आता आम्ही शिवसेना भवनात दररोज उपलब्ध आहोत,” असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना विरोधकांशी हस्तांदोलन करण्यास तयार असल्याचे संकेत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT