Ayodhya Pol 
महाराष्ट्र बातम्या

ShivSena: ठाकरे गटाला आणखी एक झटका? "अस्वस्थ...राजीनामा देण्याच्या तयारीत"; अयोध्या पौळ यांच्या पोस्टची चर्चा

राज्यातील राजकारण सध्या दोलायमान स्थितीत आहे. यात शिवसेनेच्या ठाकरे गटाची स्थिती काहीशी अस्थिर बनली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यातील राजकारण सध्या दोलायमान स्थितीत आहे. यात शिवसेनेच्या ठाकरे गटाची स्थिती काहीशी अस्थिर बनली आहे. त्यात पुन्हा एकदा ठाकरेंना झटका बसणार असल्याची स्थिती आहे.

कारण त्यांच्या एका महिला पदाधिकाऱ्याची सोशल मीडिया पोस्टची सध्या चर्चा सुरु आहे. अस्वस्थ आहेत, राजीनामा देण्याच्या तयारीत....असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. (Shiv Sena Thackeray group another blow social media coordinator Ayodhya Pol made sensational post)

पौळ यांनी काय केलीए पोस्ट?

शिवसेना ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक असलेल्या अयोध्या पौळ यांनी ही पोस्ट लिहिली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, "लवकरच ब्रेकिंग न्यूज....अस्वस्थ आहेत, राजीनामा देण्याच्या तयारीत...." यानंतर #राजकीय_चिखल असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. (Latest Marathi News)

#राजकीय चिखल

अयोध्या पौळ यांच्या यापोस्टवरुन त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे स्पष्ट होत नाही. पण राजकीय चिखल झाल्याचा उल्लेख करत ब्रेकिंग न्यूज असं म्हटल्यानं ठाकरे गटातूनच कोणीतरी मोठी व्यक्ती राजीनाम्याच्या तयारीत असल्याचा संकेत यातून दिसतो आहे. कदाचित अयोध्या पौळ याच राजीनाम्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. कारण त्यांच्या ट्विटर बायोमध्ये शिवसेनेचा कुठलाही उल्लेख दिसत नाही. तसेच प्रोफाईल कव्हरमध्येही त्यांनी केवळ बाळासाहेब ठाकरेंचा यांच्या कोटसह फोटो वापरला आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या फोटोचा समावेश नाही. (Marathi Tajya Batmya)

कोण आहेत अयोध्या पौळ?

अयोध्या पौळ यांच्या ट्विटर बायोप्रमाणं त्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक आहेत. मराठवाड्यातील त्या रहिवाशी आहेत तसेच अयोध्या सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी तसेच ट्रान्सजेंडर आणि एलजीबीटीक्यू समाजाच्या न्याय हक्कांच्या त्या समर्थक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT