cm eknath shinde on uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray News : ठाकरेंना आज मोठा धक्का! एका बड्या नेत्याचा शिंदे गटामध्ये होणार प्रवेश

संतोष कानडे

Mumbai News : ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसणार असल्याचं कळतंय. ठाकरे गटाचा एक बडा नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटात पसरलेली नाराजी दूर होण्यास मदत होणार असल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करुन धक्का दिला होता. आज त्यापेक्षा मोठा धक्का ठाकरेंना बसणार आहे. विधान परिषदेतला बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हा पक्षप्रवेश आज दुपारी होणार असल्याची माहिती आहे. मागील अनेक वर्षांपासून पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या या नेत्यांसोबत आणखी दोन मोठे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळतंय. सध्या त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत असून आज दुपारी ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येतंय.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले ४० आमदार त्यांच्यासोबत आले होते. त्यानंतर सुरु झालेली पक्षप्रवेशाची मोहीम थांबायचं नाव घेत नाही. प्रत्येक विभाग, जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवरील पदाधिकारी शिंदेंवर विश्वास दाखवत आहेत.

आजचा संभाव्य पक्षप्रवेश झालाच तर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसेल. कारण मागील कित्येक वर्षांपासून ते पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत आहेत. एक निष्ठावान ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. ते कधी शिंदेंकडे येतील, असं वाटत नव्हतं. परंतु आज प्रवेश निश्चित असल्याचं मानलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT