Shivaji Maharaj eSakal
महाराष्ट्र बातम्या

Shivaji Maharaj Afzal Khan Statue: 'प्रतापगडाच्या पायथ्याशी खान…पुन्हा एकदा होणार शिवाजी राजांच्या करामतीची जाण'; कोथळा बाहेर काढणारा पुतळा बसवणार

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातील 'अफझलखानाचा वध' हा एक महत्वाचा भाग आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातील 'अफझलखानाचा वध' हा एक महत्वाचा भाग आहे. हा प्रसंग म्हणजे शिवरायांच्या शौर्याचं प्रतिक मानलं जातं. यावर शाहिरांनी अनेक पोवाडे देखील रचले आहेत. प्रत्येक शिवजयंतीदिनी आपल्याला अफझलखानाचा वध हा पोवाडा ऐकायला मिळतो. शिवरायांच्या याच शौर्याचं प्रतिक असलेला पुतळा राज्य शासनानं तयार केला आहे. लवकरत तो प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्यात येणार आहे.

मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या पुतळ्याची उंची १८ फूट इतकी आहे. हा पुतळा आता पूर्णपणे तयार झाला असून त्याची झलकही एका व्हिडिओतून पहायला मिळाली आहे. येत्या महिन्याभरात सरकारकडून या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.

पुतळ्याची वैशिष्ट्ये काय?

शिवाजी महाराज अफझल खानाचा वाघनख्यांच्या सहाय्यानं कोथळा बाहेर काढतानाचं हे शिल्प आहे. यामध्ये शिवराय आणि अफझलखान अशा दोघांचे पुतळे आहेत. शिल्पकार दिपक थोपटे यांनी हे शिल्प साकारलं आहे. एकूण १८ फूट उंचीचं हे शिल्प आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची ही १३ फूट तर अफझलखानाच्या पुतळ्याची उंची १५ फूट आहे. या शिल्पाचं एकत्रित वजन ७ ते ८ टन आहे. हे शिल्प साकारायला ९ महिने लागले. यासाठी १५ जणांच्या टीमनं काम केलं.

ऐतिहासिक संदर्भ काय?

विजापूरच्या आदिलशाहचा सरदार असलेल्या अफझल खान याला प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेटीसाठी निमंत्रण दिलं होतं. यासाठी मोठा शामियाना टाकण्यात आला होता. या दोघांच्या भेटीचा दिवस हा 10 नोव्हेंबर 1659 हा होता. यावेळी अफझल खान शिवाजी महाराजांची गळा भेट घेण्यासाठी पुढे आला आणि त्यानं महाराजांची मान आपल्या काखेत दाबली आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.

पण चतुर शिवरायांनी आपल्या बोटातील वाघनख्यांचा वार करत अफझलखानाच्या कोथळा बाहेर काढला. आपल्यावर अशा प्रकारे हल्ला होऊ शकतो याची अफझल खानाला कल्पना नसल्यानं तो यामुळं गडबडला आणि जोरजोरात ओरडू लागला आणि जमिनीवर कोसळला. अशा प्रकारे शिवरायांनी अफझल खानाचा वध केल्याचं इतिहासतज्ज्ञ सांगतात. पण शिवाजी महाराजांनी आपल्यावरील हल्ला परतवून लावताना शत्रूचाच खात्मा केला यामुळं या प्रसंगाला 'शिवप्रताप' असंही संबोधलं जातं. त्यामुळं ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस महाराष्ट्रात शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dussehra Rally Speech: ‘’मी वर्क फ्रॉम होम अन् फेसबुक लाईव्ह करणारा नाही’’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

IND vs WI, 1st Test Video: ध्रुव जुरेलच्या विकेटकिपिंगने जिंकली मनं! सूर मारत चेंडू आडवत टीकाकारांना दिलं उत्तर

Shivsena Dasara Melava: ''...ही गोष्ट मान्य केली पाहिजे'', लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरे भाजपवर बोलले

Dussehra Melava 2025 Live Update: हिंदुत्व म्हणजे टी-शर्ट आहे का?- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT