amol kolhe and narendra modi
amol kolhe and narendra modi 
महाराष्ट्र

Shivaji Maharaj : भाजपला शिवाजी महाराज का खुपतात? अमोल कोल्हे भडकले

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली आहे. यावर खासदार अमोल कोल्हे यांनी आधीच प्रतिक्रिया दिली होती. मात्र त्यांनी व्हिडीओ शेअर करून पुन्हा आपला संताप व्यक्त केली आहे. (Shivaji Maharaj news in Marathi)

अमोल कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली हे त्रिवेदी यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलं. तुम्हाला शिवाजी महाराज का खुपतात. वारंवार शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य का केले जातात, असा सवालही अमोल कोल्हे यांनी भाजपला केला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस धर्मासाठी नसून धर्म माणसासाठी असल्याचं शिकवलं. अठरापगड जातीच्या लोकांना त्यांनी एकत्र केलं, हे तुम्हाला खुपत का? स्वराज्य कस असावं याचा वस्तूपाठ महाराजांना घालून दिला, हे तुम्हाला खुपत का? असे प्रश्न कोल्हे यांनी विचारले.

कोल्हे पुढं म्हणाले की, हिंदुस्थानातील भलेभले राजे-रजवाडे औरंगजेबाच्या दरबारात माना खाली घालून बसत होते, तेव्हा फक्त शिवाजी महाराज होते, औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून उभे होते. त्यांनीच आम्हाला स्वाभिमान काय असतो, ते शिकवलं. इंडियन आर्मीच्या अनेक बटालियन आहेत, सर्व बटालियनच्या वॉरक्रायला देवांची नावे आहेत. फक्त मराठा बटालियनच्या वॉर क्रायला शिवाजी महाराजांचं आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे. त्यामुळे त्रिवेदींनी माफी मागावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT