Shivaji Maharaj Surat Loot Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivaji Maharaj Surat Loot: मुघलच नाही, इंग्रजही घाबरले... 350 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या पेपरमध्ये सुरत लुटीबद्दल काय छापून आलेलं?

Shivaji Maharaj Surat Loot News: शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीची बातमी लंडन गॅझेट या ब्रिटिशांच्या सरकारी वृत्तपत्रात छापून आली होती. त्यामध्ये मुघलांसह इंग्रजही घाबरले असल्याचा उल्लेखही आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या आठवड्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुर्घटना घडली होती. यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. अशात महाविकास आघाडीने काल मुंबईत सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन केले होते.

दरम्यान या आंदोलनावर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी राजकारण करत असल्याची टीका केली. यावेळी फडणवीस यांनी, "काँग्रेसने शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली असा खोटा इतिहास शिकवला," असे म्हणत टीका केली.

दरम्यान फडणवीस यांच्या या आरोपानंतर दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. अशात सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीची बातमी लंडन गॅझेट या ब्रिटिशांच्या सरकारी वृत्तपत्रात छापून आली होती असे दिसत आहे. त्यामध्ये मुघलांसह इंग्रजही घाबरले असल्याचा उल्लेखही आहे.

दुसऱ्या सुरत लुटीची लंडन गॅझेटमधील बातमी

17 ते 20 फेब्रुवारी 1672 च्या लंडन गॅझेटच्या अंकात लिहिण्यात आले आहे की, "दोन दिवसांपूर्वी आम्हाला सुरत येथे राहणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी लिहिलेली पत्रे मिळाली, ज्यातून आम्हाला तेथील दैनंदिन दहशतीची माहिती मिळाली. क्रांतीकारी छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी अनेक लढायांमध्ये मुघलांना पराभूत केले आहे, ते जवळजवळ देशाचे स्वामी झाले आहेत. त्यांनी सुरत येथील सर्व युरोपियन मंत्र्यांना पत्र लिहिण्याचे धाडस केले असून, देणगी म्हणून भेटवस्तू (त्यांच्या मते खूप मोठी रक्कम) मागितल्या आहेत. त्यांच्या मागण्या पाठवण्यास नकार दिला तर ते परत येतील आणि ते शहर नष्ट करतील."

दरम्यान लंडन गॅझेटमध्ये आलेल्या या वृत्तावरून लक्षात येते की, छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त मुघलच नाही तर इंग्रजही घाबरत होते.

Shivaji Maharaj News In London Gazette 1672

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

काल मुंबईत महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात होते. त्यावेळी ते म्हणाले, "हे आंदोलन पूर्णपणे राजकीय आहे. महाविकास आघाडी असो वा काँग्रेस पक्ष, त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही. नेहरूजींनी द डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. त्यासाठी काँग्रेस आणि एमव्हीए माफी मागेल का?"

फडणवीस पुढे म्हणाले, "स्वातंत्र्याच्या अनेक वर्षांनंतरही त्याच काँग्रेसने आपल्याला शिकवले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण महाराजांनी कधीच सुरत लुटली नव्हती. याबद्दल काँग्रेस माफी मागणार का?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT