Raj Thackeray
Raj Thackeray  Sakal
महाराष्ट्र

Dasara Melava : शिवाजी पार्कवर तुम्हीच मेळावा घ्या; राज ठाकरेंना भावनिक साद

निनाद कुलकर्णी

Dasara Melava At Shivaji Park : आगामी दसऱ्या मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा नेमकं कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. या सर्व प्रश्नावर अद्यापपर्यंत ठोस असा कोणताच निर्णय झालेला नाही. तोच आता शिवाजी पार्कवर राज ठाकरेंनी मेळावा घ्यावा अशी भावनिक साद मनसैनिकांकडून राज ठाकरेंना पत्राद्वारे करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्र ट्वीट केले आहे.

संदीप देशपांडेंच्या पत्रात नेमकं काय?

आदरणीय साहेब, सविनय जय महाराष्ट्र!

वंदनीय हिंदुहृदयसम्राट के, बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे आपल्या महाराष्ट्रातील केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक समीकरणही होते. सलग चार दशकांहून अधिक काळ 'एक वक्ता, एक मैदान आणि लक्ष लक्ष श्रीते हा चमत्कार अवध्या जगात कुठे पहायला मिळाला असेल तर तो इथेच आपल्या शिवतीर्थावर दसऱ्याच्या दिवशी मराठीजनांच्या रांगाच्या रांगा ढोल-ताशे वाजवत, गुलाल उधळत शिवतीर्थावर येत आणि हिंदुहृदयसम्राटांकडून मिळालेल राष्ट्रभक्ती आणि महाराष्ट्र धर्माचे 'बाळकडू'- विचारांचं सोनं घेऊन घरी परतत

दुर्दैवाने, वडिलोपार्जित वास्तूत राहतो इतक्याच पुण्याईवर स्वतःला हिंदुहृदयसम्राटांचे राजकीय वारसदार म्हणवणाऱ्यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या आणि आक्रमक मराठी अस्मितेच्या धगधगत्या विचारकुंडालाच तिलांजली दिली. ज्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्षांवर प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राटांनी संपूर्ण हयातभर लेखणी, कुंचला आणि वाणीने आसूड ओढले, त्याच राष्ट्रद्रोही- धर्मद्रोही पक्षांशी आघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांवर मतदान करणाऱ्या लक्षावधी शिवसैनिकांचा आणि मतदारांचा विश्वासघात केला. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! बरं, इतके सगळं करूनही स्वतः चा राजकीय पक्ष आणि सरकार या वारसदारांना सांभाळता आलं नाहीच.

एरवी या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं असतं. पण आता कै. बाळासाहेब ठाकरे यांचे आम्हीच खरे वारसदार अस म्हणत 'यू टर्न' आणि 'बंडखोर' असे दोन्ही गट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची भाषा करत आहेत. लक्ष लक्ष मराठीजनांसमोर हिंदुत्वाचं अग्निकुंड धगधगतं ठेवण्यासाठी ज्वलंत भाषण करण्याची क्षमता मात्र त्यांपैकी कुणातच नाही! ज्या दसरा मेळाव्यामुळे राज्यातील मराठी भूमिपुत्रविरोधी आणि देशभरातील हिंदूविरोधी राजकीय पक्षांना धडकी भरायची, तोच दसरा मेळावा आज राजकीय चेष्टा मस्करीचा विषय ठरत आहे, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?

वंदनीय कै. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या चार अक्षरांवर प्रेम करणारा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारा प्रत्येक मराठी आणि हिंदू व्यथित झाला आहे. गोंधळला आहे. त्याच्या मनातला हा गोंधळ दूर करणं अत्यंत गरजेच आहे. हिंदूची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! म्हणूनच कोट्यवधी हिंदू तसंच मराठीजनांच्या वतीने जामच्यासारख्या लक्षावधी हिंदवी रक्षकांची, महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे.

दसऱ्यानिमित्त शिवतीर्थावर आपल्या परखड, रोखठोक 'ठाकरी' शैलीतील वक्तृत्वाच्या तेजःपुंज आविष्काराची "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..." या हाकेची महाराष्ट्र आणि अवघा हिंदुन आतुरतेने वाट पहात आहेत. धन्यवाद!

आपला नम्र, महाराष्ट्र सैनिक,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT