महाराष्ट्र बातम्या

प्रत्येक गावात होणार शिवार संवाद सभा

सकाळन्यूजनेटवर्क

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. राज्यभर 25 ते 28 मे असे चार दिवस प्रत्येक गावात भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी यांच्या शिवार संवाद सभा होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे हे शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत. त्यांनी सांगितले, की या उपक्रमात पहिल्या दिवशी 25 मे रोजी एकाच दिवशी सोळा हजार गावांमध्ये सोळा हजार सभा होणार आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी सकाळी दोन व सायंकाळी दोन सभांमध्ये संवाद साधेल. हा उपक्रम 28 मे रोजी पूर्ण होईल. तोपर्यंत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी संवाद केलेला असेल.

ते म्हणाले, की पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये, तर रावसाहेब पाटील दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्याच दिवशी पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षणमंत्री विनोद तावडे, तसेच बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद करतील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथे भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा समारोप करताना शेतकरी संवाद सभांच्या उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार केलेल्या नियोजनाप्रमाणे 25 ते 28 मे या कालावधीत या शेतकरी संवाद सभा होणार आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनांची पूर्ण माहिती होऊन वंचित शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा म्हणून हा संवाद होणार आहे, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT