Shivneri 
महाराष्ट्र बातम्या

शिवनेरीचा निधी थकला; मुख्यमंत्र्यांनी शिवजयंती सोहळ्याला केलेली घोषणा हवेत

गणेश कोरे

पुणे - छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला २३ कोटींचा निधी आगामी शिवजयंती आली तरी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे पुरातत्त्व, वन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होणारी विकासकामे रखडली आहेत. आगामी शिवजयंतीपूर्वी हा निधी मिळून कामे सुरु होण्याची अपेक्षा शिवप्रेमींकडून व्यक्त होत आहे. 

महाविकास आघाडीचा स्थापना झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यादांच १९ फेब्रुवारी २०१९ रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून शिवनेरी विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीच्या घोषणेची अपेक्षा शिवभक्तांना होती. ती त्यांनी २३ कोटींच्या निधीची घोषणा करत पूर्ण देखील केली. सकाळी शिवजयंतीच्या सोहळ्यात घोषणा आणि संध्याकाळी मंत्रिमंडळ बैठकीत निधीला मान्यता देखील देण्यात आली होती. एवढी तत्परता महाविकास आघाडी सरकारने दाखविली होती. मात्र, आता शिवजयंतीचा दुसरे वर्ष जवळ आले तरी अद्याप मंजूर केलेला निधी मिळाला नसल्याचे विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रलंबित निधीबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच बैठक देखील घेतली. त्यात विविध विभागांना त्यांची प्रस्तावित कामे आणि त्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे विविध विभागांनी आपापले आराखडे सादर करून तीन महिन्यांचा कालावधी झाला. डिसेंबरअखेर देखील हा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही.

पुरातत्त्व विभागाच्या वतीने अंबरखाना इमारत ते शिवकुंज इमारत दगडी पायवाट, विविध तटबंदीचे संवर्धन, अंबरखाना इमारतीमध्ये संग्रहालय आणि माहिती केंद्र या कामांसाठी ७ कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाला दिला आहे. हा निधी लवकरच मिळून कामाला सुरुवात केली जाईल.  
- बी. बी. जंगले, संरक्षक सहायक, पुरातत्त्व विभाग (जुन्नर विभाग) 

शिवनेरी विकास प्रकल्पाच्या निधीच्या मागणीचा तीन विभागांचा सुमारे २३ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे. हा निधी लवकरच मिळून संबंधित विभागांकडे वर्ग केला जाईल. शिवजयंतीपूर्वी विविध विकासकामांना सुरुवात होईल.  
- संजय मरकळे, जिल्हा नियोजन अधिकारी 

शिवनेरी विकास प्रकल्पासाठी आम्ही सातत्याने विविध विभागांसोबत समन्वय साधत असतो. अंबरखाना इमारतीमध्ये सातवाहन, शिवकालीन संग्रहालय आणि माहिती केंद्र उभारावे, अशी मागणी आम्ही गेली अनेक वर्षांपासून करत आलोय. त्यानुसार संग्रहालयासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रात उल्लेख आहे. हा निधी लवकरात लवकर पुरातत्त्व विभागाला मिळून काम सुरु व्हावे, एवढीच आमची अपेक्षा आहे.  
- कृष्णा देशमुख, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर

मंजूर निधी

  • ७ कोटी - पुरातत्त्व विभाग
  • ५ कोटी - वन विभाग
  • ११ कोटी - सार्वजनिक बांधकाम विभाग
  • २३ कोटी - एकूण 

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramrao Wadkute Death News : धनगर समाजाचा चेहरा हरपला! भाजप राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

IND vs NZ: केएल राहुल सामन्यानंतर ग्लेन फिलिप्सला देणार पार्टी, पण का? न्यूझीलंडविरुद्ध नेमकं काय घडलं?

Pune Weather: पुण्याचे किमान तापमान नीचांकी ११.२ अंशांवर

Marathi News Live Updates : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा दणदणीत विजय

IND vs NZ, 1st Test: भारतीय संघाने इतिहास घडवला,न्यूझीलंडचा घाम काढला! ७ फलंदाजांच्या ५०+ पार्टनरशिप अन् ७००+ धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT