महाराष्ट्र बातम्या

यंदाचा शिवराज्यभिषेक सोहळा कसा होणार? संभाजीराजेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

संदीप खांडेकर

रायगड : यंदाचा शिवराज्याभिषेक सुमारे ३४७ वर्षांपूर्वीच्या सुवर्ण होनाने(Golden Hon)होणार असल्याचे ट्विट करत खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती( MP Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati)यांनी आज पहाटे अवघ्या महाराष्ट्रवासीयांसह देशवासीयांना सुखद धक्का दिला आहे. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडन (Henry Oxindon)ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर भेटायला आला होता. त्यावेळी त्याने 'इंग्रजी नाणी स्वराज्यात चालू द्यावीत,' अशी मागणी केली. तेव्हा महाराजांनी 'तुमची नाणी आमच्या मुलुखात चालणार नाहीत, आम्ही आमची स्वतःची टांकसाळ सुरु करून तेथे नाणी टांकसाळीत करणार आहोत,' असे सांगितले होते, असे इतिहास अभ्यासक सांगतात. shivrajyabhishek-ceremony-held-347-years-ago-with-golden-hon-sambhaji-raje-tweet-for-social-media

शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी रायगडच्या टांकसाळीमध्ये तयार झालेले ‘सुवर्ण होन’ मिळणे म्हणजे दुर्मीळच. हे होन इतके दुर्मीळ आहेत, की आजही केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके अस्सल होन उपलब्ध आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दुर्गराज रायगडच्या राजसदरेवर सुवर्ण होनाने शिवराज्याभिषेक होणार असल्याचे ट्विट केल्याने यंदाच्या सोहळा ऐतिहासिक महत्त्व असणार आहे.

स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा 'होन' हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक 'होन'च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार.असे ही संभाजीरीजे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT