shivrajyabhishek  esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivrajyabhishek 2025: शिवराज्याभिषेका मागे उद्दिष्ट काय होते? शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कोणती स्वप्ने पाहिली होती

Significance of Shivrajyabhishek in Indian History : आज रायगड किल्ल्यावर भव्य असा ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

Kiran Mahanavar

Shivrajyabhishek Sohala 2025 : आज ६ जून म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर झाला आणि मराठा साम्राज्याला खर्‍या अर्थाने सुरू झाली. नंतर याच मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडा लावला.

शिवराज्याभिषेकाचे महत्व सांगताना जेष्ठ इतिहास संशोधक 'वा.सी. बेंद्रे' आपल्या 'श्रीशिवराजाभिषेक' ग्रंथात लिहतात कि, छत्रसिंहासनाच्या धर्मसिद्ध प्रतिष्ठेने हिंदवी राज्यसंस्थेला सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक श्रेष्ठ दर्जा व स्थैर्य प्राप्त होण्याचे उद्दिष्ट या राज्याभिषेकामागे होते.

" राज्याभिषेक हा एक संस्कार आहे, तो आवश्यक आहेच परंतु केवळ राज्याभिषेक हि स्वराज्याची फलश्रुती नव्हे. अॅबे कॅरे हा फ्रेंच प्रवासी शिवकाळात हिंदुस्थानात येऊन गेला. चौल बंदरानजीक त्याचे एका मराठा अधिकाऱ्याशी जे संभाषण झाले ते त्याने त्याच्या प्रवासवर्णनात लिहून ठेवले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची स्थापना केली तेव्हा स्वतंत्र राज्याची घोषणा केली नव्हती. पुढे जस जस स्वराज्य वाढू लागले तेव्हा शत्रू कट रचू लागले. मुघल गोरगरीब जनतेवर अन्याय करू लागले ,आया बहिणीची विटंबना मोठ्या प्रमाणात वाढली. साधुसंताची अवहेलना होऊ लागली हे सगळे दुषित वातावरण नीट करण्यासाठी स्वराज्य स्थिर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतंत्र राजा म्हणून घेणं गरजेच होतं.

त्यासाठी मग राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व सहकारी यांनी राज्याभिषेक सोहळ्याचं प्रयोजन आखलं. एका बखरीत 'महाराजांचा प्रताप दिवसेंदिवस वाढत चालला असे जाणून छत्र सिंहासन करावे, राज्याभिषेक करावा, असा सर्वांचा मनोदय जाहला', असा उल्लेख आढळतो.

राज्याभिषेक करून घेण्यामागे मुख्य दोन उद्दिष्ट होते.

1) छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाने राजा म्हणून मान्यता मिळणार होती.

2) आणि सर्वच शत्रूंना छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून स्वीकारावेच लागणार होते. वेदमूर्ती गागाभट्टांनी शिवाजीराजांचा राज्याभिषेक केला आणि छत्र धारण केले, नाणी पाडणे आणि नवीन शक सुरू करणे ही सार्वभौमत्वाची तिन्ही चिन्हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अंमलात आणली. राज्याभिषेकावेळी राज्यव्यवस्थेत महत्वाचे बदल करण्यात आले. आणि त्यानंतर स्वराज्याचा कारभार सुरू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय, बुधवार पेठेतील कुंटणखाना तीन वर्षांसाठी सील

Jaya Bachchan warn Priyanka Chaturvedi: जया बच्चन राज्यसभेत बोलताना अचानक शेजारीच बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींवर उखडल्या, म्हणाल्या...

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Prakash Solanke: प्रकाश सोळंकेंनी गळाला लावलेले बाबरी मुंडे नेमके कोण? पंकजांसह धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का!

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

SCROLL FOR NEXT