Aaditya Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : 'हिला दिया'; आदित्य ठाकरेंनी CM शिंदेंना पुन्हा डिवचलं!

वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर शिंदे गट आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. यानंतर आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी शिंदे गटासह मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे.

याविषयी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, "माझ्या विधानावरुन भरपूर चर्चा झाली. सोशल मीडियावरही हाच विषय चालू होता. एक नक्की...हिला दिया. एवढ्या सगळ्यांनी ट्वीट करण्यापेक्षा स्वतः सांगितलं असतं की लढायची ताकद नाहीय, हिंमत नाहीय, तरी चाललं असतं."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वरळी इथल्या सत्कार कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. तिथे शिंदे काय बोलतात, याकडे आता लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून वरळीतही ठाकरे गटाकडून पदाधिकारी ओढण्याचं काम सुरू आहे. नुकतंच वरळीतले शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतरच आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

Latest Marathi News Live Update: : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली आनंददायी दिवाळी; 'नंदनवन' बंगल्यावर फराळ वाटप करत दिल्या शुभेच्छा

Siddi Community Marathi Song Viral Video : आफ्रिकन लूक अन् अस्सल मराठी गावरान ठसका; माठावर ठेका धरत सिद्दी तरुणांनी गायले ‘हिरो होंडा’ गीत

SCROLL FOR NEXT