Eknath Shinde Aaditya Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Aditya Thackeray : स्वतःची मेस्सी, रोनाल्डो सोबत तुलना करत ठाकरेंनी CM शिंदेंना डिवचलं!

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढण्याचं चॅलेंज दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सध्या राज्यभर दौरे करत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते सातत्याने एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेनेवर टीका करत आहे. वरळीतून निवडणूक लढण्याचं चॅलेंज त्यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे.

वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी येणार आहे. तिथे त्यांची सभाही होणार आहे. यावरुनच आदित्य ठाकरेंनी मेस्सी, रोनाल्डोचं उदाहरण देत शिंदेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, "माझा विजय हाच आहे की, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माझ्या मतदार संघात येऊन सभा घेतायत. आता वरळीत सभा घेताय, घ्या. तुम्हाला गल्लीगल्लीत फिरायला लागेल, पण तरीही विजय माझाच आहे."

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, " जेव्हा फुटबॉलची मॅच असते, तेव्हा मेस्सी, रोनाल्डोच्या बाजूला चार पाच खेळाडू लावले जातात. सचिन तेंडुलकरसाठी वेगळी रणनीती आखली जाते. माझ्या बाबतीतही तेच होतंय. त्यांना घेऊदे सभा. पण तरीही मी वरळीतून लढणार. माझं डिपॉझिट जप्त झालं तरी लढणार."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT