anil parab esakal
महाराष्ट्र बातम्या

मला त्रास देऊ नका; परब-सोमय्या वादाविरोधात साई रिसॉर्टचा मालक कोर्टात

आपल्याला आपली बाजू मांडण्याची संधीच दिली गेली नाही, असंही या रिसॉर्टच्या मालकाने म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनिल परब किरीट सोमय्या यांच्यामुळे चर्चेत आलेल्या साई रिसॉर्टच्या मालकाने आता थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या वादात माल नाहक नोटिसा का असा सवाल या मालकाने विचारला आहे. तसंच आपल्याला बाजू मांडण्याची संधीच मिळालेली नाही, असंही त्याने म्हटलं आहे.

याप्रकरणी याचिकाकर्ते सदानंद कदम यांच्या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात होणार सुनावणी होणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान विभागानं (एमओइएफसीसी) या रिसॉर्ट्सच्या मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये या रिसॉर्टवर कारवाई का करू नये?, अशी विचारणाही केली आहे. तसंच या रिसॉर्टकडून २५ लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

या सगळ्या प्रकरणात आता या नोटिशीविरोधात या रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. हा रिसॉर्ट आधी राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या मालकीचं असल्याचा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे हा रिसॉर्ट सातत्याने चर्चेत होता. आताही लवकरच हा रिसॉर्ट आपण पाडणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Viral Video : स्वच्छतागृहात शिवरायांचा अन् राणी पद्मावतींचा फोटो; नेटकऱ्यांनी आक्षेप घेताच बदलला फोटो...

कोणत्या वयात लग्न करावं? तेजश्री प्रधानने चाहत्यांना दिला सल्ला, म्हणाली..'30 च्या आधी की नंतर ते...'

अजितदादा महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री, त्यांनी पहिल्यांदा टायमिंग चुकवलं; CM फडणवीसांनी सांगितल्या आठवणी, शेवटची भेट...

Latest Marathi News Live Update : अजितदादांची ती शेवटची भेट असेल असं वाटलं नव्हतं : मुख्यमंत्री फडणवीस

Climate Change: हवामान बदलाचे परिणाम थोपविण्यासाठी खोचला पदर; पती निधनाचे दुःख बाजूला सारून खारफुटीची रोपे लावण्यात महिलांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT