Balasaheb thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Video: शिवसेनेची काँग्रेस होऊ देण्यापेक्षा... बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ बावनकुळेंनी केला शेअर

Balasaheb thackeray old video: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर बोचरा वार केला आहे. बावनकुळे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटावर बोचरा वार केला आहे. बावनकुळे यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बाळासाहेब म्हणतात की, शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन. (Congress Shivsena Balasaheb thackeray old video shared by chandrashekhar bawankule)

बावनकुळे यांनी एक्सवर बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर केला आहे. आज मुंबईमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे नेते यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. यात्रेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील मदत केली आहे. यावरुन बावनकुळे यांनी निशाणा साधला असल्याचं बोललं जातंय.

बावनकुळे म्हणाले की, 'शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता.याच शिवतीर्थावरून हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली.'

‘‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,‘‘ असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे दाखवणार का? वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे, असं बावनकुळे म्हणाले.

आज ‘न्याय यात्रेची’ नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? हाच प्रश्न आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे विसरले असतील तर काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते ते ऐकाच, असं म्हणत बावनकुळे यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT