Uddhav Thackeray and PM Modi Google
महाराष्ट्र बातम्या

''खुज्या राज्यकर्त्यांना कोण सांगणार?'' इंदिरा गांधींच्या मुद्द्यावरून सेनेची मोदींवर टीका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दोन दिवसांपूर्वी बांगलादेश युद्धात भारताच्या विजयाच्या स्मृतीनिमित्य देशात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचं नाव घेतलं नाही. त्यावरून प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. तसेच विरोधकांनी देखील मोदी सरकारचा समाचार घेतला. आता शिवसेनेने सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर (PM Modi) बोचरी टीका केली आहे.

''इंदिरा गांधीं यांना वगळून जगाचा इतिहास कोणालाच लिहिता येणार नाही'' -

''1971 साली बांगलादेशचे युद्ध हिंदूस्थानने जिंकले त्यास ५० वर्ष झाली. ५० व्या विजय दिनानिमित्त शूर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. त्या विजय दिवशी झालेल्या कार्यक्रमात पराक्रमी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव घेण्याचे सौजन्यही नरेंद्र मोदी यांनी दाखवले नाही. इंदिरा गांधींनी धाडस दाखवले नसते तर पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवताच आली नसती. इंदिरा गांधी यांना वगळून देशाचा नव्हे, तर जगाचा इतिहास कोणालाच लिहिता येणार नाही. पण, आपल्या देशातील खुज्या राज्यकर्त्यांना हे कोण सांगणार?'', असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींवर कऱण्यात आला आहे.

''दिल्लीतील राज्यकर्ते गोधडीत रांगत असतील'' -

''इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि १९४७ च्या फाळणीचा बदला घेतला. इंदिरा गांधी या जगातील शक्तीमान नेत्या म्हणून जगासमोर आल्या. हिंदूस्थानकडे वाकड्या नजरेनं पाहाल, तर पाकिस्तानचे केले तसे तुकडे करू, असा संदेश इंदिरा गांधींनी जगाला दिला. त्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना सध्याच्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचं साधं नावही घेऊ नये? त्यांचं नाव घ्यायला भय वाटतं की लाज वाटते? इंदिरा गांधींनी १९७१ चा पराक्रम केला, तेव्हा आजचे दिल्लीतले राज्यकर्ते कदाचित गोधडीत रांगत असतील” अशी बोचरी टीका पंतप्रधान मोदींवर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT