महाराष्ट्र बातम्या

'स्वत:मध्ये धमक असेल तर आव्हान द्या; ईडी, सीबीआयच्या जीवावर नको'

सकाळ डिजिटल टीम

देवेंद्र फडणवीस यांनी अजुनही मला मी मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं वक्तव्य केलं होतं. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

शिवसेनेचा दसरा मेळावा सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडले. आजचा हा क्षण आपल्या आयुष्यासाठी मोलाचा आहे. जी परंपरा शिवसेना प्रमुखांनी १९६६ ला सुरु केली. ती आपण समर्थपणे पुढे नेतोय याचा अभिमान असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तसंच शस्त्रपूजन झाल्यानंतर समोर बसलेल्या तुम्हा कार्यकर्त्यांवर फुलं उधळली, तुम्हीच आमचे खरे शस्त्रे आहात.

देवेंद्र फडणवीस यांनी अजुनही मला मी मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं वक्तव्य केलं होतं. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की,'माझा जन्म महाराष्ट्रात झाला पाहिजे हेच मला वाटतं. मला कधीही मी मुख्यमंत्री आहे असं वाटू नये, मलाच काय पण जनतेलासुद्धा मुख्यमंत्री आहे असं वाटू नये. तर मी घरातलाच भाऊ किंवा कोणीतरी आहे असं वाटावं.' काही जणांना वाटतं की, जे बोलत होते मी पुन्हा येईन, ते बोलतायत आता मी गेलोच नाही, बस तिकडे आहेत ते तिकडेच राहिले असाही टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना लगावला.

पदं येतील जातील आणि पुन्हा येतील. आजोबा आणि वडिलांनी शिकवण दिलीय. जी संस्कृती आहे ती हीच की पदं काय आहेत, सत्ताधारी काय आहेत, पदं येतील, जातील, सत्ता येईल जाईल, पण कधीही मी कोणीतरी आहे. अहंपणा डोक्यात जाऊ देऊ नको. ज्या दिवशी हवा डोक्यात जाईल त्या दिवशी संपलास अशी शिकवण मिळाली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. नेहमी जनतेशी नम्र रहा हेच मी करतो, आशीर्वाद कधीच जोरजबरदस्तीने मिळत नाही. ते कमवावे लागतात. आणि ते मिळाले आहेत मला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरेंनी भाषणात घेतला. ते म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांनी एक वक्तव्य केलं. भाजपात गेल्यानंतर कुंभकर्णासारखी झोप येते, दरवाजावर ठोकलं तरी मी उठत नाही, हिम्मत असेल तर अंगावर या असं म्हणतात. आम्ही कशाला येऊ अंगावर, तुमची लायकी तरी आहे का आणि आम्ही अंगावर जात नाही आणि आलं तर सोडत नाही.

आम्हाला शिवरायांनी आणि शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिली आहे. अंगावर येण्याची भाषा स्वत:मध्ये हिम्मत आणि धमक असेल तर द्या. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून देऊ नका असं म्हणत केंद्रीय तपास संस्थांचा वापर करून दबावाची भाषा करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी भाषणातून उत्तर दिलं. मीसुद्धा पक्षप्रमुख म्हणून आव्हान देईन, मुख्यमंत्री म्हणून नाही. शिवसैनिकांच्या जोरावर आव्हान देईन असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं याला नामर्द म्हणतात, हे मर्दाचं लक्षण नाही, हिंदुत्त्वाचं तर नाहीच नाही असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

माझ्या भाषणाची वाट पाहतायत

आज मी कोणाला बोलणार, कोणाचे वाभाडे काढणार अशी चर्चा आहे. विषयांची गर्दी झाली. पण कोरोनाच्या या काळात गर्दी चालत नाही, आता विचारांची गर्दी कशी टाळणार, माझ्या भाषणानंतर माझं भाषण संपतंय कधी याची अनेकजण वाट पाहतायत. प्रतिक्रिया देण्यासाठी आतुर झाले असतील. त्यांना बोलुद्या. टीकाकारांसाठी बोलत नाही. जनतेसाठी, माता भगिनींसाठी बोलतोय. ठाकरे कुटुंबियांवर हल्ले करतायत. खरंतर असा कोणी माई का पूत जन्माला आला नाही ठाकरे कुटुंबावर हल्ला करणारा. आता ठाकरे कुटुंबावर सतत टीका करत राहणं हे त्यांच्यासाठी रोजगार हमीचं काम झालंय असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

स्टेशनवर गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याऐवजी वृद्ध थेट इंजिनवरच उभा राहिला; VIDEO VIRAL

जरागेंच्या उपोषणाचा १० वा दिवस, प्रकृती खालावल्यानं मराठा बांधवांचा सरकारला इशारा | Jarange Patil

Marathi News Live Updates : सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वताबाबत अहवालाची मुदत वाढवण्याची याचिका फेटाळली

Ahilyanagar News: अहिल्यानगरच्या चार तालुक्यांचा होणार कायापालट; आकांक्षित तालुका योजनेत प्रत्येकी ५ कोटींचा अतिरिक्त निधी

SCROLL FOR NEXT