

UP Viral Video: Elderly Man Travels on Moving Train Engine
Esakal
UP Viral Video: धावत्या ट्रेनच्या इंजिनला लटकून प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बरेलीतील हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येतोय. दरम्यान या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओत एक वृद्ध व्यक्ती गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकात ट्रेनच्या इंजिनच्या समोरच्या भागावर उभा राहिल्याचं दिसतंय. प्रवाशांनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला आहे.