Shivsena Dasara Melava Nilam Gorhe Balasaheb Thackeray soul at Shivaji park mumbai  
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Dasara Melava: "बाळासाहेबांचा आत्मा शिवाजी पार्कवरच"; शिवसेना नेत्याचा विश्वास

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज मुंबईत शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. शिवसेना-शिंदे गटात सुरू असलेल्या सत्तासंघर्षादरम्यान उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान शिवाजी पार्क येथे होत असलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान बाळासाहेबांचा आत्मा इथेच असणार याची आम्हाला खात्री आहे असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

आज शिवतीर्थावर राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक गोळा झाले आहेत, त्यांच्याकडे पाहून खरी शिवसेना कोणती हे लक्षात येते असे शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच एकनाथ शिंदे यांचा बीकेसीवर होत असलेल्या मेळाव्याबाबत बोलताना त्यांनी, बऱ्याचशा लोकांना ते कुठे निघालेत ते बऱ्याच जणांना माहिती नाहीये असं व्हिडिओमध्ये दिसत आहे, मात्र शिवतीर्थावर कुठल्याही अमिषाला बळी न पडता लोक आले आहेत असे सांगितले.

शिंदेंच्या मेळाव्यावर टीका करताना गोऱ्हे म्हणाल्या की, एखादी परंपरा, इतिहास आमचाच आहे असे म्हणणे, हे उघड-उघड आमच्या पक्षावर घातलेला दरोडा असल्याचे देखील त्या म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी आपल्यापैकी कोणाचा आत्म्यावर विश्वास असेल, कोणाचा नसेल. पण बाळासाहेबांचा आत्मा इथेच असणार याची आम्हाला खात्री आहे असेही म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : 'युती फक्त राज्यात' म्हणत पुणे महापालिका सभागृह नेते गणेश बीडकरांचा राष्ट्रवादीला थेट इशारा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT