EKnath Shinde Devendra Fadnavis Amit Shah Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Row : शिवसेना चिन्ह व नाव मिळताच शिंदे सरकार अ‍ॅक्टिव्ह मोडवर; अमित शाहांशी चर्चा करणार

उद्या कोल्हापुरात अमित शाहांसोबत बैठक होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंचं सरकार येऊन आठ महिन्यांचा काळ लोटला तरीही अजून मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. आता शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारासाठीच्या हालचाली वाढल्याचं चित्र दिसत आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी हा विस्तार करण्याचा शिंदे- फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती 'साम'च्या सूत्रांनी दिली आहे. याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती हाती येत आहे. अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

उद्या अमित शाह कोल्हापुरात बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकीसंदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठीचा वेग आता शिंदे फडणवीस सरकारने वाढवला आहे.

राज्यात दीर्घकाळापासून शिंदे - ठाकरे यांचा पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी संघर्ष सुरू होता. सर्वोच्च न्यायालयाने हा चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवल्यानंतर आयोगाने हा निर्णय दिला आहे. आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना आलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : ''माझी गाडी लोक वर्गणीतून घेतलेली, लोकपाल सदस्यांना कशाला हव्यात महागड्या गाड्या?'', अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी...

Parner News : गडरक्षण हीच खरी शिवसेवा! खासदार छत्रपती शाहु महाराज

SIR ECI PC: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद गाजणार! १५ राज्यांसाठी SIR तारखा जाहीर होणार, पण कधी?

Ranji Trophy: अंजिंक्य रहाणेचं दीडशतक, मुंबई ४०० धावा पार; महाराष्ट्रासाठी विकी ओत्सवालच्या ६ विकेट्स, मिळवून दिली मोठी आघाडी

Pune Traffic Jam : पुण्यात कात्रज बोगदा ते वारजे पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी! , पुणेकर दीड तासांपासून अडकले

SCROLL FOR NEXT