Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : हे नवं चिन्हच शिवसेनेत नवी क्रांती घडवेल; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

पोलीस आज संजय राऊतांना सुनावणीसाठी न्यायालयाकडे घेऊन जात होते.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या वादामध्ये अखेर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि पक्षाचं नावही गोठवलं आहे. यावरुन दोन्ही गटांमधून प्रतिक्रिया येत असून पुढील कायदेशीर बाबींची पूर्तताही करण्यात येत आहे. या सगळ्या गोंधळावर राज्यातल्या अनेक प्रमुख नेत्यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि सध्या कोठडीमध्ये असलेले संजय राऊत यांनीही इशाऱ्यानेच प्रतिक्रिया दिली आहे.

आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. त्यासाठी पोलीस राऊतांना न्यायालयाकडे घेऊन जात होते. त्यावेळी जाता जाता माध्यमांनी त्यांना चिन्ह गोठवण्यात आल्याविषयी प्रतिक्रिया देण्याचा आग्रह केला. त्यावेळी त्यांनी मान हलवून त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पुढे तुम्ही कारागृहात जाताना महाराष्ट्र कमजोर होतोय, असं म्हणाला होता, त्याविषयी विचारलं असता त्यांनी मान हलवून होकार देत आपण खरंच बोललोय, असा इशाराही त्यांनी हाताने केला.

राऊतांना न्यायालयात नेताना आजूबाजूला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांनी चिन्हं गोठवल्याविषयी विचारलं असता राऊतांनी उत्तर दिल्याचं सामच्या सूत्रांनी सांगितलं आहे. राऊत म्हणाले, "चिन्ह गेल्याची ही पहिली वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीही अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. तीनवेळा त्यांचे चिन्ह बदललं होतं. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. हे काही नवीन नाही. हे नवं चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. नावात काय आहे? खरी शिवसेना कुणाची हे सगळ्यांना माहित आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Statement : 'मतदार संघात जाऊन बेईमान खासदारांना धडा शिकवणार, उद्धव ठाकरे-पवारांशी चर्चा'; संजय राऊत संतापले

Latest Marathi News Live Update : "जीव गेला तरी चालेल, पण माघार नाही!" – तुपकरांचा सरकारला इशारा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात 'मे' चा हप्ता जमा, पण 'या' दीड लाख महिला राहणार वंचित; नेमकं काय घडलं?

Pune Shirdi Express: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुणे-शिर्डी दररोज धावणार नवी एक्स्प्रेस; रेल्वे दौंड, अहिल्यानगर, राहुरीमार्गे

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! महिन्याभरात सोनं 17 हजारांनी स्वस्त; खरेदी करण्याआधी जाणून घ्या आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT