महाराष्ट्र बातम्या

राणेंची कीव येते, त्यांना शॉक देण्याची गरज - शिवसेना

नामदेव कुंभार

नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना असा वाद पेटण्याची शक्यता

जळगाव : माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने विद्यमान मुख्यमंत्री यांच्या बाबत काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे, मात्र हे भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करून शॉक दिला पाहिजे अशी टीका शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर बोलताना मी असतो तर त्यांच्या कानात लगावली असती असे वक्तव्य केले आहे,त्या वर शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की,राज्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदाची गरिमा काय असते याची माहिती आहे. मुख्यमंत्री हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो,तो संपूर्ण राज्याचा असतो त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काय बोलावे याचे त्यांना भान नसेल तर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले पाहिजे वेळ पडली तर त्यांना शॉक सुध्दा दिले पाहिजे.

अंगातील भूत उतरवा

नारायण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यावेळीही विरोधी पक्ष होते, त्यावेळी त्यांच्याकडे एक गरिमा होती. परंतु आता गरिमा नसलेले विरोधी पक्ष येथे आला आहे.मला तर वाटते यांच्या अंगात काय चुडैल घुसली की काय असे मला वाटते आहे. कोणत्या तरी भक्ताकडे नेऊन यांच्या अंगातील भूत उतरवण्याची गरज आहे.

राणेंची मला कीव येते

नारायण राणे यांनी वक्तव्या बाबत माफी मागण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त करून मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री यांची माफी मागण्याची ही लायकी राणे यांची नाही,बोलताना आपण काय बोलतो याचा त्यांनी विचार करावा त्यांनी कसे बोलावे हे मला त्यांना सांगावे लागते याचीच मला राणे यांची कीव येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT