महाराष्ट्र बातम्या

Kishori Pednekar: "नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, डोक्यात पण काहीतरी असावं लागतं"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुक लढेल

सकाळ डिजिटल टीम

आगामी निवडणुकीत एकही नेता शिवसेनेत नसेल, तर शिवसेनेतील सगळे नेते शिंदेगटात येतील, असं बावनकुळे म्हणाले होते. त्यालाच उत्तर देताना शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी बावणकुळे यांना लक्ष्य केलं आहे. नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं, अश्या कठोर शब्दात किशोरी पेडणेकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये झालेल्या वादा प्रकरणी न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे जाणार असल्याचं पेडणेकर म्हणाल्या आहेत.

आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होईल. एकही नेता शिवसेनेत नसेल, तर शिवसेनेतील सगळे नेते शिंदेगटात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुक लढेल. याआधी मिळाले नसेल त्यापेक्षा जास्त यश या सरकारला प्राप्त होईल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं.

त्याचबरोबर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा बराच वेळेला अनुभव आहे. खरंच ते शब्द पाळणारे होते. पण आता 236 वाढ करणारे तुम्हीच आणि आता यांच्या नादाला लागून ज्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावत आहे ते 227 करत आहेत. मग शब्द कोण फिरवतोय. आम्ही मानतो तुम्ही शब्द पाळणारे एकदम कट्टर शिवसैनिक होता पण आज तुम्ही फक्त म्हणायला शिवसैनिक आहात. 236 चे 227 करायला भाग पाडणारे आणि शब्द फिरवणारे अशी तुमची इमेज म्हणते ती मला वाटतं फार घातक आहे असे मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT