Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंचे ठाकरे सरकारला तीन प्रस्ताव, आमदार वर्षाकडे रवाना

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत साधारण 35 आमदार नॉटरिचेबल आहेत.

निनाद कुलकर्णी

मुंबई : विधान परिषदेच्या काल लागलेल्या निकालानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत साधारण 35 आमदार नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेमक्या भावना काय आहेत याबद्दल भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी शिंदे यांनी शिवसेनेला तीन पर्याय दिले आहेत. (Eknath Shinde Latest News In Marathi)

शिंदे यांनी शिवसेनेला राज्यात भाजप सोबत सत्ता, फडणवीस मुख्यमंत्री आणि स्वतः उपमुख्यमंत्री बनवण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. दानवे यांच्या या विधानामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात दिल्लीतदेखील भाजपच्या उच्च पदस्थ नेत्यांच्या बैठकींना वेग आला असून, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहे. तर अमित शाह हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीला निघाले आहेत. या तिघांमध्ये आता भेट होण्याची शक्यता आहे.

राणे म्हणाले, शाब्बास! एकनाथजी... नाहीतर तुझा आनंद दिघे झाला असता

दरम्यान, नाराज शिंदे नॉटरिचेबल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात, नाही तर लवकरच तुझाही आनंद दिघे झाला असता, असे म्हटले आहे. राणेंच्या या विधानानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या असून, अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र सूर्याचा महाराष्ट्रात उदय होईल - सदाभाऊ

महाविकास आघाडीची एकजूट किती आहे हे संध्याकाळी समजेल - संजय राऊत महाराष्ट्रातील जनता विचारत आहे सत्तापालट कधी? संध्याकाळ गेली.. सत्तेची काळी रात्र पण लवकरच सरेल. आणि देवेंद्र सूर्याचा महाराष्ट्रात उदय होईल, असं ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Traffic : लोणावळ्यात २२० वाहनांवर कारवाई; एक लाख ८२ हजारांचा दंड वसूल

MPSC: ‘एमपीएससी’त अपात्र ठरलेल्या खेळाडूंना दिलासा; छत्रपती संभाजीनगर, निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरविण्याचे मॅटचे आदेश

Supriya Sule : महायुती सरकारने दिवाळखोरीकडे वाटचाल केली; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न

SCROLL FOR NEXT