Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Political News: "माझा शिवसेनेतील प्रवेश सुषमा अंधारेंना प्रतिउत्तर देण्यासाठी नाही"

ज्योती वाघमारे यांचा जिल्हाप्रमुख अमोल शिंदेंच्या पुढाकारातून शिवसेनेत प्रवेश

अंकिता खाणे (Ankita Khane)

मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील ती जबाबदारी निभावणार आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी भीमशक्ती - शिवशक्ती यांना एकत्रित आणण्याचे ऐतिहासिक काम केले, त्यांच्याच विचाराचा वारसा घेऊन चालणाऱ्या शिवसेनेत काम करणार असल्याचे ज्योती वाघमारे यांनी सांगितले आहे.

मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव दौऱ्यावर असताना सोलापूर विमानतळावर आले होते. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या पुढाकाराने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या ज्योती वाघमारे यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर ज्योती वाघमारे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात होते. शनिवारी त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून दोनच दिवसांत त्यांना पदनियुक्तीचे पत्र दिले जाणार आहे.

ज्योती वाघमारे यांनी यापूर्वी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष म्हणून दीड वर्षे काम पाहिले आहे. त्यानंतर मागील सात ते आठ वर्षे त्या राजकारणापासून दूर होत्या. आता शिवसेनेकडून त्यांना मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आंबेडकरी चळवळीचा वैचारिक वारसा, अभ्यासू विचारपूर्वक मांडणी करता येणारे वक्तृत्व यामुळे त्यांना प्रदेश प्रवक्ते पद मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

वैचारिक विरोध असू शकतो. राजकीय विरोधक असणे हे देखील स्वाभाविक आहे. मात्र, व्यक्तीविरुद्ध व्यक्ती असणे चुकीचे आहे. माझा शिवसेनेतील प्रवेश सुषमा अंधारे यांना प्रतिउत्तर देण्यासाठी केला जात असल्याची चर्चा चुकीची आहे. अंधारेंविरुद्ध वाघमारे, अशी मांडणी करणे चुकीचे आहे असं ज्योती वाघमारे यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT