Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'अजित पवारांची अमित शाहांबरोबर…', संजय शिरसाटांचा मोठा दावा

'राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील, याला शरद पवारांची मुक संमती आहे', असंही संजय शिरसाट म्हणालेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या बैठकांमध्ये वाढ झाली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घडामोडी घडू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ‘सिल्व्हर ओक’ वर बैठक झाली होती.

या बैठकीत शरद पवारांनी मोठा खुलासा केला. भाजपाबरोबर जाण्यासाठी कुटुंबाला लक्ष्य केलं जात आहे. कुणाला व्यक्तिगत निर्णय घ्यायचा असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण, पक्ष म्हणून आम्ही भाजपाबरोबर जाणार नाही, असं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी सामनाच्या ‘रोखठोक’ मधून केला आहे.

राऊतांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. यावर शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील, याला शरद पवारांची मुक संमती आहे,” असं संजय शिरसाटांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलं आहे.

तर पुढे शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना बोलवून शरद पवारांनी इशारा दिला असावा, असं माझं मत आहे. दीड तासांची बैठक चहा, पाणी करून किंवा एक वाक्य बोलून होत नसते. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम वाजवायचा होता तो वाजवलेला आहे. राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहत नाही, त्यासाठी ते कुणाबरोबरही युती करण्यात तयार असतात. त्यामुळे महाविकास आघाडीत त्यांना राहायचं नाही. त्यांचा कल भाजपाकडे आहे. म्हणून ते भाजपाबरोबर जातील,” असा दावा संजय शिरसाटांनी केला आहे.

तर “राष्ट्रवादीतील काही लोक फुटतील. कारण, याला शरद पवारांची मुक संमती आहे. अजित पवार, प्रफूल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शाहांबरोबर ८ एप्रिलला ठरवून बैठक केली. उद्या राष्ट्रवादी भाजपाबरोबर आल्यास नवल वाटण्यासारखं काहीच नाही,” असंही शिरसाटांनी पुढे म्हंटलं आहे.

अजित पवार भाजपासोबत गेल्यानंतर शिवसेनेची काय भूमिका असणार? असा प्रश्न विचारल्यावर शिरसाट म्हणाले, “अजित पवारांना त्यांची कातडी वाचवायची आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांचीही ईडी चौकशी सुरु आहे. मग, यांना भीती नाही का? फक्त तुम्हालाच भीती आहे का? हे सर्व खोटं आहे. मात्र, आम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेणार नाही. भाजपाने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे,” असंही शिरसाटांनी यावेळी म्हंटलं आहे.

तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली नसल्याचं म्हंटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात सुरु होणार ५ नवीन न्यायालयं, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Vaibhav Sooryavanshi All Records: वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षभरात मोडलेत ९ वर्ल्ड रेकॉर्ड्स! जाणून घ्या एका क्लिकवर.. तुम्हाला यातले किती माहित होते?

Latest Live Updates Marathi : आधीच्या सरकारांच्या काळातही पेपर फुटण्याच्या घटना घडल्या : जितेंद्र सिंह

BSNL Network Issue in Sangli : BSNL जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर? 538 पैकी अवघ्या 82 गावांत फायबर; 'कनेक्टिंग इंडिया'च्या नाऱ्याला मोठा धक्का!

Suraj Sakhare Attack : वडिलांचा पराभव अन् रस्त्याचं काम बंद पाडल्याचा राग! गुंड सूरज साखरेवरील गोळीबार महापालिका राजकारणातून; गणेश खाडेनं शूटरांना दिलेलं ॲडव्हान्स एक लाख

SCROLL FOR NEXT