Santosh Bangar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Santosh Bangar: 'टीका करणाऱ्यांना ठेचण्याचं काम...', संतोष बांगरांची जीभ घसरली

वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे संतोष बांगर पुन्हा एकदा केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनेतील वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे नेते तथा आमदार संतोष बांगर वारंवार आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. बांगर यांनी पुन्हा एकदा वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. नांदेड येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

यावेळी बोलताना संतोष बांगर यांची जीभ घसरली आणि त्यांनी विरोधकांना थेट ठेचण्याची भाषा केली आहे. सोशल मीडियावरुन आपल्यावर टीका करणाऱ्यांना ठेचण्याचं काम करावं लागणार असल्याचं संतोष बांगर म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर बांगर यांनी हे वक्तव्य केले आहे. नांदेडमध्ये काल शनिवारी (27 मे) रोजी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी श्रीकांत शिंदे उपस्थित होते.(Latest Marathi News)

दरम्यान याच कार्यक्रमात बोलताना संतोष बांगर म्हणाले, "फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून कोणी जर आपल्याला बोलत असेल, तर त्याला तिथल्या तिथे ठेचण्याचे काम आपल्याला करावे लागेल." त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका होत आहे.

तर संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यासह संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्यावर हल्लाबोल केला आहे.(Latest Marathi News)

काय म्हणालेत संतोष बांगर?

"जिल्हाप्रमुख पद पुन्हा पाहिजे असेल तर विनायक राऊत यांना 5 तोळ्याची चैन द्यावी लागले, तर विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं बक्षीस देखील मी दिले असल्याचा आरोप बांगर यांनी केला आहे.

तर जेवणाचे पैसे सुद्धा मीच दिले होते. त्यामुळे बबन थोरात यांना नांदेडला पाय ठेऊ देऊ नका, खासदारकीला देखील बबन थोरात यांनी फक्त पैसे गोळा करण्याचे काम केले असल्याचा आरोप बांगर यांनी केले. तसेच जे लोक आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, ते सुद्धा आपल्याकडे येतील असं देखील संतोष बांगर म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी' मधलं 'सुपरनोव्हा' गाणं प्रदर्शित; पण सुपरनोव्हा म्हणजे काय?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवले; तीन पाळीव मांजरांचा मृत्यू

Kinwat Forest Department: किनवट वन विभागाला हायकोर्टाचा झटका; RTI माहिती न दिल्याप्रकरणी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT