Eknath Shinde, Devendra Fadanvis Sakal Digital
महाराष्ट्र बातम्या

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राऊतांचा खळबळजनक दावा; शिंदे गटातील 12 आमदार संपर्कात

शिंदे-फडणवीस सरकारचा गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे पार पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर राहिलेला असताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, शिंदे गटातील 12 आमदार संपर्कात असल्याचा दावा विनायक राऊतांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना सोमवारी रात्री राऊतांनी हा दावा केला आहे.

राऊत म्हणाले की, “ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा इतर कोण असतील हे सर्व आता एकमेकांच्या उरावर बसण्यास सुरूवात करतील. त्यामुळे हे मंत्रिमंडळ औटघटकेचं मंत्रिमंडळ असेल यात कोणतीही शंका नाही,” अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली. त्यांनी माध्यमांशी साधललेल्या संवादादरम्यान शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. “सध्या काही जण अस्वस्थ आहेत आणि त्यापैकी १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत,” असा दावाही राऊत यांनी केला.

भाजप-शिंदे गटातील या व्यक्ती घेणार शपथ

आज सकाळी 11 वाजता राजभवन येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाकडून उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, भरत गोगावले, शंभूराज देसाई आदींना मंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर, भाजपकडून 11 जण शपथ घेणार आहेत यामध्ये चंद्रकांत पाटील, राधा कृष्ण विखे पाटील, सुधीर मुनंगटीवार, गिरिष महाजन, सुरेश खाडे, अतुल सावे, मंगल प्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आदी नऊ नावं निश्चित झाली आहेत. उर्वरित दोन नावांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

फडणवीसांकडे वजनदार खाती?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदापासून लांब ठेवल्यानंतर त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी असेल, यावरून अंदाज वर्तविणे सुरू होते. फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खात्याची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे. वजनदार खाती फडणवीस यांच्याकडे ठेवून एकप्रकारे सरकारवरच ‘कंट्रोल’ ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 3 दिवसांत 56,000 रुपयांनी स्वस्त! 24K, 22K आणि 18K सोनं कितीला? चांदीही नीचांकी पातळीवर

Sangli District Bank Election : दुष्काळाचा 'ड्रामा' अन् सग्यासोयऱ्यांचा 'हंगामा'; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील 'या' पॅटर्नची राज्यभर चर्चा

IND vs NZ 2nd T20I: इशान किशनला नेमकं काय झालं? दुसऱ्या सामन्यातून घेतली माघार, आता मालिकेला मुकणार? BCCI ने दिले अपडेट्स

Marathi News Live Updates: आधी कारने धडक दिली, रस्त्यावर पडताच लोखंडी रॉडने चेहऱ्यावर वार करत मित्रानेच केला बंटी दीक्षितचा निर्घृण खून

Central Railway: कल्याण-कसारा विशेष ब्लॉकचा प्रवाशांना फटका! लोकलसह एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार; पाहा नवे वेळापत्रक

SCROLL FOR NEXT