ShivSena Minister Remark on Hema Malini  e sakal
महाराष्ट्र बातम्या

हेमा मालिनीच्या गालांसारखे रस्ते नसतील तर राजीनामा देईन - गुलाबराव पाटील

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : जिल्ह्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. यामध्ये राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shivsena) एकमेकांच्या विरोधात लढत आहे. सध्या प्रचार सभांनी जोर धरला असून एकमेकांवर टीका-टिप्पण्या केल्या जात आहेत. एकनाथ खडसेंवर (Eknath Khadase) टीका करताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Shivsena Minister Gulabrao Patil) यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या (Actor Hema Malini) गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांची सभा होती. यावेळी त्यांनी थेट आव्हान देत एकनाथ खडसेंना डिवचलं. ''३० वर्ष आमदार राहिलेल्या लोकांना माझं आव्हान आहे की, त्यांनी माझ्या मतदारसंघात धरणगावला येऊन पाहावं. मी काय विकास केला हे त्यांना दिसेल. धरणगावला हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते दिसले नाहीतर राजीनामा देऊन टाकेन'', असं गुलाबराव पाटील म्हणाले. बोदवडच्या रस्त्यांच्या उल्लेख करत त्यांनी एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला. अरे हे काय रस्त्ते आहेत का? असा सवाल करत महाराष्ट्राला ज्ञान शिकवता, आधी बोदवडचे रस्ते करा, असं आव्हान त्यांनी खडसेंना दिले.

एकनाथ खडसे काय म्हणाले? -

जिल्ह्यात नगरपंचायतच्या निवडणुका आहेत. शिवसेना राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढत आहे. गुलाबराव पाटलांनी निवडणुकीच्या ओघात केलेलं हे भाष्य आहे. गुलाबराव पाटलांना माहिती आहे, की ३० वर्ष नाथाभाऊंनी काय केलं. गेल्या ३० वर्षात मी एकही निवडणूक हरलेलो नाही. त्यामुळे मी किती काम केलं हे जनतेला माहिती आहे. त्यांना हेमा मालिनी का आठवली हे माहिती नाही. जो तो आपल्या कुवतीप्रमाणे बोलत असतो. पण, त्यावर मला टीका-टिप्पणी करणं योग्य वाटत नाही, असं एकनाथ खडसे TV 9 मराठी सोबत बोलताना म्हणाले.

'गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करा' -

हेमा-मालिनीचे गाल आणि रस्त्याची तुलना केल्याबाबत गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. रंगलेल्या गालाच्या मुक्यासंदर्भात मी केलेलं वक्तव्य संदर्भहीन असताना त्यांनी काय गदारोळ घातला होता ते अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. आता महाविकास आघाडी सरकार गुलाबराव पाटलांवर काय कारवाई करणार? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT