Bhaskar Jadhav Sakal
महाराष्ट्र बातम्या

Bhaskar Jadhav : रात्री घरावर हल्ला, सकाळी सुरक्षा काढली; BJP विरोधी बोलणं जाधवांना भोवलं?

भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत असून भाजपा आणि शिंदे गटावर सातत्याने टीका करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या घरावर काल रात्री हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या घराबाहेर काही संशयास्पद वस्तू आढळल्याने याबद्दल कळलं आहे. दरम्यान, आता त्यांची सुरक्षा काढून घेतल्याचीही माहिती मिळत आहे. भाजपा आणि शिंदे गटाविरोधात बोलणं त्यांना भोवलं की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून भास्कर जाधव सातत्याने भाजपा आणि शिंदे गटाविरुद्ध भाषणं करत आहेत. त्यात राणे परिवाराशीही त्यांचा संघर्ष होत होता. त्यात त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर हा संघर्ष पेटला की काय अशी शंकाही उपस्थित होत होती. माजी खासदार निलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भास्कर जाधवांची नक्कल केली होती. तर त्याला उत्तर देताना कुडाळ जिल्ह्यातल्या मेळाव्यात टीकेला उत्तर देताना त्यांनी राणेंसह सगळ्या भाजपा नेत्यांवर टीका केली होती.

या सगळ्यामध्येच भास्कर जाधव यांची सुरक्षा काढून घेतली असल्याची माहिती सामच्या सूत्रांनी दिली आहे. ते सातत्याने भाजपा विरोधात करत असलेल्या वक्तव्यांचेच हे पडसाद असल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. रात्री हल्ला झाल्याची शंका असताना सकाळी सुरक्षा काढून घेतल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी खात्यात 3,000 रुपये जमा होणार का? जाणून घ्या मोठी अपडेट

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा सामना होणार रद्द? चिंता वाढवणारे अपडेट्स, मालिका बरोबरीत सुटणार?

अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रसिद्ध ३० वर्षीय इन्फ्लुएन्सर लग्नबंधनात अडकणार, थेट ७५ वर्षीय व्यक्तीसोबत साखरपुडा पार

Navratri Day Six: आज नवरात्रीची सहावी माळ! देवी कात्यायनीची पूजा कशी करावी? जाणून घ्या मंत्र, नैवेद्य आणि पौराणिक कथा

Supreme Court: सुनावणी सुरु असताना CJI सूर्यकांत यांच्यासमोरच न्यायालयात राडा! वकिलाचा मायक्रोफोन हिसकावला, चालू प्रकरणातून वकिलाची माघार

SCROLL FOR NEXT