Rahul Narvekar On Shivsena Mla Disqualification Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेबाबत हालचालींना वेग! सुधारित वेळापत्रक उद्या सादर होणार? आज राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग आला आहे. आमदार अपात्रतेबाबत काय निर्णय येणाक याकडे राज्यासह देशाचेही लक्ष लागले आहे. सध्या शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. अशात विधानसभा अध्यक्ष प्रकरण निकाली लावण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप केला, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना फटकारलं.

तर सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक सादर करण्याचे निर्देशही विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राजधानी दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, 'मी दिल्लीला चाललो आहे. हा दौरा पूर्वनियोजित आहे. त्यासाठी मी चाललो आहे. महाधिवक्त्यांचीही मी भेट घेणार आहे. कायदेशीर सल्ला घेऊन मी निर्णय घेईल, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार अपात्रतेची याचिका दाखल झाल्यानंतर ही नोटीस जाणं हा प्रक्रियेचा भाग आहे, असं नार्वेकर म्हणालेत.

सर्वोच्च न्यायालयाने वेळापत्रक सादर करण्यासाठी वेळ

17 ऑक्टोबरला आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना तीव्र शब्दात फटकारलं. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे. 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर मांडण्याची उद्या तारीख आहे.

दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी बसून विधानसभा अध्यक्षांसोबत सुनावणीचं वेळापत्रक ठरवावं, अशा सूचना न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिल्या होत्या. आता उद्या हे वेळापत्रक सादर केलं जाणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT