Anil Parab News 
महाराष्ट्र बातम्या

Anil Parab: "हा वेळकाढूपणा! आमदारांना अपात्र करावेच लागेल, नाहीतर..." अनिल परबांनी स्पष्ट सांगितले

Sandip Kapde

Anil Parab News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना व उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेच्या कारवाईसाठी लेखी उत्तर मागितले होते. दरम्यान शिंदे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांकडे मुदत वाढून मागितली आहे.

शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण लांभणीववर पडण्याची शक्यता आहे. यावर ठाकरे गटातील आमदार अनिल परब यांनी केली आहे.

अनिल परब म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे. तो निर्णय देताना काही गाईडलाईन दिल्या आहेत. त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे १६ आमदारांना अपात्र घोषित करावी लागेल. ही वेळकाढूपणा भूमिका आहे. म्हणून पुन्हा मुदत वाढ मागितली आहे. आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ. लवकरच निर्णय येईल

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ४० आमदारांना आणि उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधानसभेच्या सदस्यत्वाच्या अपात्रतेबाबत उत्तर मागण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अपात्रतेच्या याचिकांवर लवकर सुनावणी घेण्याचे निर्देश सभापतींना द्यावेत, अशी विनंती केली होती.

आमदार सुनील प्रभू यांनी, अविभाजित शिवसेनेचे मुख्य व्हिप म्हणून गेल्या वर्षी शिंदे आणि इतर १५ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. जेव्हा शिंदे गटाने बंड केले आणि जून २०२२ मध्ये राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT