Sharad Pawar Shahaji Bapu Patil Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shahaji Bapu Patil : "उद्धव ठाकरेंच्या मार्फत माझं तिकीट कापण्याचा शरद पवारांचा प्लॅन होता"

त्यांच्या जवळ जे गेले, त्यांना सगळ्यांना त्यांनी हरवून बाद करून टाकलं, असंही पाटील म्हणाले आहेत.

वैष्णवी कारंजकर

शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शरद पवारांबद्दल एक गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मार्फत आपलं तिकीट कापण्याच्या तयारीत होते, असं विधान त्यांनी केलं आहे. पण आपण पवारांच्याच तालमीत तयार झालोय हे ते विसरले, असंही पाटील म्हणाले आहेत.

काय म्हणाले शहाजी बापू पाटील?

आमदार खासदार आपल्या दारी या कार्यक्रमादरम्यान शहाजी बापू पाटील यांनी हे विधान केलं आहे. ते सध्या सांगोल्याच्या दौऱ्यावर आहेत. पाटील म्हणाले, "शरद पवार हे देशाचे नेते आहेत. आता ते मानतायत की नाही माहित नाही, पण गेले ४५ वर्षे ते माझे पालक आहेत. पण पवारांच्या राजकारणाच्या इतिहासाचा जर बारकाईने विचार केला, तर त्यांच्या जवळ जे गेले, त्यांना सगळ्यांना त्यांनी हरवून बाद करून टाकलं."

पाटील पुढे म्हणाले, "जे पक्ष त्यांच्याजवळ गेले, ते सगळे लहान लहान पक्ष पवारांनी संपवलं. शिवसेना १५ च्या वर जाऊ द्यायचं नाही, असा त्यांचा प्लॅन होता. पण आमचे त्यावेळचे नेते उद्धव ठाकरे मंत्रालयाकडे येत नव्हते. ते पाहून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे नेतृत्व दिलं."

४० आमदारांची यादी तयार होती, त्यांची तिकीटं कापण्याचा विचार होता, असा दावाही शहाजी बापूंनी केला आहे. या यादीत आपलंही नाव होतं. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून आपलंही तिकीट कापण्याचा प्लॅन होता, असंही शहाजी बापू पाटील म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT