Kailas Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Kailas Patil: खासदार ओमराजे निंबाळकरांच्या सभेत कैलास पाटलांना चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु...नेमकं काय घडलं?

Kailas Patil: धाराशीव येथे लोकसभा निवणुकीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार सुरु होता. यावेळी आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शीतलकुमार शिंदे

Kailas Patil:

धाराशिव: उमेदवारी दाखल करण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीत धाराशिवचे आमदार कैलास पाटलांना उष्माघात सहन करावा लागला. उन्हाच्या तिव्रतेमुळे त्यांना अचानक भोवळ येऊन ते जमिनीवर कोसळले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेवर योग्य उपचार केल्याने त्यांची तब्बेत आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

धाराशीवमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातून शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली होती. भर उन्हात काढण्यात आलेल्या या रॅलीत आमदार पाटील पूर्णवेळ सहभागी होते. ते एका ट्रकवरून अन्य नेत्यांसह लोकांना अभिवादन करत होते. लोकांचे अभिवादन स्वीकारत होते.

ट्रकवरून उतरून ते सभामंचाकडे जात असताना त्यांना उष्माघात झाला. रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर राहिलेली असतानाच त्यांना भोवळ येऊन ते खाली कोसळले.

दरम्यान काल पासून उन्हाची तीव्रता वाढली असून पारा चाळीशीच्या जवळपास आहे. आज मंगळवारी (ता. १६) तापमान ३७ अंश सेल्सिअस असल्याची नोंद आहे. मात्र प्रत्यक्षात ते ३८ अंश सेल्सिअस जाणवत होते. यामुळे लोकांनी उन्हाच्या तीव्र झळा पासून स्वतःचे संरक्षण करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

निवडणुकांचा प्रचार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची धावाधाव उन्हाच्या तिव्रतेतच होत आहे. यात आणखी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आग ओकत आहेत. परिणामी सर्वत्र वातावरणाने उष्णतेचा पारा कमालीचा वाढला आहे. यापासून स्वतःचा बचाव करण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने यापूर्वीच केले आहे. (lok sabha update 2024)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT