नितीन देशमुख Sakal
महाराष्ट्र बातम्या

धाकधूक वाढली; शिंदेंसोबत असलेल्या शिवसेना आमदाराला हृदयविकाराचा झटका

शिवसेनेचे अकोल्यातील बाळापूर येथील आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समोर आलं आहे.

दत्ता लवांडे

सुरत : सध्या राज्यभर राजकीय नाट्याने जोर धरला असून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. याअगोदर त्यांच्या पत्नीने ते हरवले असल्याची तक्रार केली आहे. त्यांनी काल फोन करून अकोल्यातील घरी परत येणार असल्याचं सांगितलं होतं पण ते आले नाहीत म्हणून ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे. तर विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तणावाचं झालं आहे.

(Shivsena MLA Nitin Deshmukh Heart Attack)

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या एका चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. तर भाजपच्या पाच आमदारांचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराच्या पराभवानंतर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत सुरत गाठलं आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार असल्याचं बोललं जातंय. त्यांच्यासोबत असलेल्या आमदार नितीन देशमुखांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे.

दरम्यान सध्या सर्वांची धाकधूक वाढली असून राज्यातील सरकारचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे भाजपला जाऊन मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या शिवसेनेच फुट पडल्याचं चित्र उभं राहिलं आहे. तर मुंबईतील शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. तर एकनाथ शिंदे आता भाजपसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

रात्री निकाल लागल्यापासून शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. ते नाराज असून त्यांना समर्थन करणाऱ्या नेत्यांसोबत ते सुरतला पोहोचले आहेत. ते भाजपच्या संपर्कात असून आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर गेले आहेत. त्यांच्या भेटीनंतर पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT